टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा 29वा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिलाच विजय होता. यापूर्वी खेळलेल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला भारत आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने पुनरागमन केले. विशेष म्हणजे, या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान याने त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद केली.
नेदरलँड्स (Netherlands) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय पाकिस्तान (Pakistan) संघाच्या गोलंदाजांनी हाणून पाडला. पाकिस्तानने नेदरलँड्सला यावेळी निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स आणि 91 धावांवर गुंडाळले. हे आव्हान पाकिस्तानने 13.5 षटकात 4 विकेट्स गमावत आणि 95 धावा करत पूर्ण केले.
यावेळी पाकिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सर्वाधिक 49 धावांचे योगदान दिले. या धावा त्याने 35 चेंडूंत पूर्ण केल्या. तसेच, 5 चौकारही मारले. यावेळी तो अर्धशतक पूर्ण करण्यास चुकला. मात्र, त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिल्या 50 डावात सर्वाधिक धावा करणारा तिसरा आशियाई फलंदाज बनला. त्याने टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या 50 डावांमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना 2342 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, याव्यतिरिक्त त्याने टी20 क्रिकेटमध्ये 65 डावांमध्ये 2500 धावाही पूर्ण केल्या.
Mohammad Rizwan completes 2️⃣5️⃣0️⃣0️⃣ runs in T20Is in his 65th innings ✅#WeHaveWeWill | #T20WorldCup | #NEDvPAK pic.twitter.com/ilHmZCxUDs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 30, 2022
या यादीत अव्वलस्थानी ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. सचिनने पहिल्या 50 वनडे डावात सलामीवीर म्हणून खेळताना सर्वाधिक 2439 धावा चोपल्या होत्या. त्याच्यानंतर वनडेतच हा विक्रम पाकिस्तानच्या इमाम उल हक (Imam Ul Haq) याच्या नावावर आहे. त्याने सलामीला खेळताना पहिल्या 50 वनडे डावात सर्वाधिक 2386 धावा चोपल्या होत्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा तिलकरत्ने (Tillakaratne Dilshan) हा आहे. त्याने पहिल्या 50 वनडे डावांमध्ये सलामीला खेळताना 2325 धावा चोपल्या होत्या.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिल्या 50 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर (आशियाई)
2439 धावा- सचिन तेंडुलकर (वनडे)
2386 धावा- इमाम उल हक (वनडे)
2342 धावा- मोहम्मद रिझवान (टी20)*
2325 धावा- तिलकरत्ने दिलशान (वनडे)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघ जिंकला, तरीही ‘या’ बाबतीत बाबर विराटच्या खालीच; स्वत:च ठरलाय कारणीभूत
पाकिस्तानला सूर गवसला! नेदरलँड्सला 6 विकेट्सने धूळ चारत साकारला टी20 विश्वचषकातील पहिला विजय