---Advertisement---

ज्या मैदानावर रोहितने २०९ धावा केल्या त्याच मैदानावर आज नव्या विक्रमासाठी सज्ज

On: बुधवार, फेब्रुवारी 27, 2019 6:13 PM
---Advertisement---

बेंगलुरु | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आज बेंगलुरुच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघ मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे. यामुळे आजचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी संघाला मिळाली आहे.

भारतीय संघाचा मर्यादीत षटकांतील क्रिकेटचा उपकर्णधार रोहित शर्मा आज कारकिर्दीतील ३००वा ट्वेंटी-ट्वेंटी सामना खेळत आहे. यापुर्वी भारतीय खेळाडूंमध्ये केवळ एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनीच ३०० सामन्यांचा टप्पा पार केला आहे.

तसेच या सामन्यात त्याला कर्णधार विराट कोहलीचा ट्वेंटी-ट्वेंटी धावांचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

रोहितने २९९ ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांत ३२.३४च्या सरासरीने ७७९५ धावा केल्या आहेत तर विराटने २५१ सामन्यांत ४०.७९च्या सरासरीने ७८३३ धावा केल्या आहेत. यामुळे जर रोहितने आजच्या सामन्यात ३९ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर भारतीय खेळाडूंमध्ये ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानाव येईल.

या यादीत सुरेश रैना ३०० सामन्यांत ३३.४७च्या सरासरीने ८००१ धावांसह अव्वल स्थानी आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-

८००१- सुरेश रैना, सामने- ३००

७८३३- विराट कोहली, सामने- २५१

७७९५- रोहित शर्मा, सामने- २९९

६४०२- गौतम गंभीर, सामने- २५१

६३९४- शिखर धवन, सामने- २२६

महत्त्वाच्या बातम्या-

–भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०आधी ऑस्ट्रेलिया संघाला बसला मोठा धक्का

–आज होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात या खास विक्रमांवर असेल नजर

–इतिहास घडविण्यापासून जसप्रीत बुमराह केवळ २ विकेट दूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment