पहिल्या सामन्यावर पाणी फेरल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माऊंगनुई येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचे काही फलंदाज चमकले, तर काहींनी निराशाजक कामगिरी केली. यामध्ये रिषभ पंत याचाही समावेश होता. पंतला मोठी धावसंख्या करता न आल्याने त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. या नकोशा विक्रमात त्याने रोहित शर्मा याच्यानंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे.
झाले असे की, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारताकडून रिषभ पंत (Rishabh Pant) आणि ईशान किशन (Ishan Kishan) डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. यावेळी रिषभ पंत याने फलंदाजी करताना फक्त 6 धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्याला 13 चेंडू खेळावे लागले. यामध्ये एका चौकाराचाही समावेश होता. पंत पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर बाद झाल्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
रिषभ पंतने पदार्पण केल्यापासून सर्वाधिकवेळा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकेरी धावसंख्येवर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) अव्वलस्थानी आहे. रोहितने 85 डावांमध्ये तब्बल 28 वेळा एकेरी धावसंख्या काढल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ रिषभ पंत आहे. पंत 55 डावात आतापर्यंत 20 वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराट 64 डावांमध्ये 15 वेळा एकेरी धावसंख्येवर तंबूत परतला आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेला केएल राहुल (KL Rahul) 62 डावांमध्ये 14 वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. (Most Single Digit scores for India since Pant’s T20I debut)
पंतच्या पदार्पणापासून सर्वाधिकवेळा टी20 क्रिकेटमध्ये एकेरी धावसंख्येवर बाद होणारे भारतीय खेळाडू
28- रोहित शर्मा (85 डाव)
20- रिषभ पंत (55 डाव)*
15- विराट कोहली (64 डाव)
14- केएल राहुल (62 डाव)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानात उतरताच भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम, ऑस्ट्रेलियाला टाकले मागे
T20 WC: सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाचे कारण बॉलिंग नाहीतर बॅटिंग, इंग्लंडच्या खेळाडूचे चकित करणारे विधान