---Advertisement---

IPL आकडेवारी: जसप्रीत बुमराहविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू, यादीत एक गोलंदाजही!

On: गुरूवार, मार्च 19, 2026 6:38 PM
---Advertisement---

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने आपल्या वेग, यॉर्कर, बाउंसर आणि व्हेरिएशनने विरोधी संघातील फलंदाजांना हैरान केले आहे. त्याच्याविरुद्ध षटकार मारणे काही सोपे नाही. आयपीएलमध्ये केवळ चार फलंदाजांनीच त्याच्याविरुद्ध ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स आहे. त्याने बुमराहने टाकलेल्या ८५ चेंडूचा सामना करताना १२५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ८ षटकार मारले आहेत. त्याने आपल्या विशिष्ट शैलीने बुमराहच्या यॉर्करचा सामना केला आहे. आणखी एक दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज या यादीत आहे.

जेपी डुमिनी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने बुमराहविरुद्ध केवळ ३३ चेंडूत ७० धावा केल्या आहेत. त्यामध्ये ६ षटकारांचा समावेश आहेत. डुमिनीच्या अचूक शॉट मारण्याच्या क्षमतेने बुमराहला अधिक त्रास झाला आहे, असे या आकडेवारीवरून दिसते.

यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने बुमराहविरुद्ध १०१ चेंडूत १५० धावा केल्या आहेत. त्यामध्ये ६ षटकारांचा समावेश आहे. विराटने त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीने आयपीएलमध्ये त्याच्याविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम केला आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. त्याने बुमराहविरुद्ध ३४ चेंडूत ५४ धावा केल्या असून त्यामध्ये ५ षटकार मारले आहेत. पाचव्या स्थानावर ड्वेन ब्रावो आहे. त्याने बुमराहने टाकलेले २७ चेंडू खेळले असून ४ षटकारांसह ३५ धावा केल्या आहेत.

तसेच फाफ डुप्लेसिस, दिनेश कार्तिक, केएल राहुल, रॉबिन उथप्पा यांनीही आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध प्रत्येकी ४-४ षटकार मारले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनी यानेही बुमराहविरुद्ध ६४ चेंडू खेळले असून २ षटकार मारले आहेत.

यंदाच्या हंगामात विराटला डिविलियर्सला मागे टाकण्याची संधी आहे, मात्र बुमराहही चांगलाच फॉर्ममध्ये आहे. हे आपल्याला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये दिसलेच आहे. यामुळे विराट विरुद्ध बुमराह रोमांचक ठरणार का, हे कळेलच.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---