क्रिकेटमध्ये सलामीला येणाऱ्या खेळाडूंकडे धावा करण्याच्या सर्वाधिक संधी असतात. कारण, सुरुवातीला पॉवरप्ले असतो, जास्त षटके खेळायला मिळतात. तरीही याचा काही खेळाडूंना फायदा घेता येत नाही. मात्र, जर तळातील खेळाडूने कमी षटके खेळून मोठमोठे विक्रम नावावर केले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात याचा प्रत्य आला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने वादळी खेळी करत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत अर्धशतक झळकावले. तसेच, खास विक्रमही नावावर केला.
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय बांगलादेशच्या खेळाडूंना सार्थ ठरवला. बांगलादेशने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 271 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून तीन खेळाडूंनी अर्धशतक झळकावले. यात श्रेयस अय्यर (82), अक्षर पटेल (56) आणि रोहित शर्मा (51) यांचा समावेश होता. भारतीय संघाची सातवी विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
Gets hit
Comes back for the team
Walks in at No.9 in a run-chase
Scores 51*(28) to get us close to the target
Take a bow captain! 🙌 🙌#TeamIndia | #BANvIND | @ImRo45 pic.twitter.com/v47ykcbMce
— BCCI (@BCCI) December 7, 2022
यावेळी रोहित शर्मा याने यावेळी फलंदाजी करताना 28 चेंडूत 51 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला. या 5 षटकारांमुळे रोहितच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. भारतीय संघाकडून वनडे डावात नवव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितने अव्वलस्थान पटकावले. तो पाच षटकारांसह दिग्गज खेळाडूंना पछाडत पहिल्या स्थानी विराजमान झाला. या यादीत दुसऱ्या स्थानी झहीर खान असून त्याने 2000मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 4 षटकार मारले होते. या यादीत 3 षटकारांसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंग आहेत.
जवागल श्रीनाथ यांनी 1998मध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 षटकार मारले होते, तर हरभजनने 2001मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 षटकार खेचले होते. (Most sixes by Indians batting at No 9 or lower in ODI innings rohit sharma at the top)
वनडेत नवव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
5 षटकार- रोहित शर्मा, विरुद्ध- बांगलादेश (2022)*
4 षटकार- झहीर खान, विरुद्ध- झिम्बाब्वे, (2000)
3 षटकार- जवागल श्रीनाथ, विरुद्ध- पाकिस्तान, (1998)
3 षटकार- हरभजन सिंग, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, (2001)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना गमावला, पण श्रेयस अय्यरने करून दाखवला नाद पराक्रम; विराट अन् धोनीला पछाडत बनला अव्वल फलंदाज
भारताच्या जखमी वाघाने रचला इतिहास! ‘या’ विक्रमात बनला जगातला दुसरा, तर टीम इंडियाचा पहिलाच फलंदाज