भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला इंदोर येथे बुधवारपासून (दि. 1 मार्च) सुरुवात झाली आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात खूपच संघर्ष करावा लागला. असे असले तरीही भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज असणाऱ्या उमेश यादव याने फलंदाजी करताना नाद पराक्रम केला. हा पराक्रम करताच उमेशने विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
झाले असे की, नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय पाहुण्या संघाच्या खेळाडूंनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. भारतीय संघाकडून सलामीला रोहित आणि शुबमन गिल फलंदाजीला उतरले होते. मात्र, रोहित 12 आणि गिल 21 धावांवरच तंबूत परतले. त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. शेवटी दहाव्या क्रमांकावर भारताकडून उमेश यादव (Umesh Yadav) फलंदाजीला आला. त्याने गिल सोडला तर इतरांच्या तुलनेत कमी चेंडू खेळून जास्त धावा केल्या. त्याने 13 चेंडूंच्या मदतीने 17 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 चौकार आणि 2 षटकारही भिरकावले.
Umesh Yadav goes BIG!
Two sixes so far!#INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 1, 2023
विराटच्या विक्रमाची बरोबरी
उमेश यादवने 2 षटकार खेचताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. उमेश यादवने भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली (Virat Kohli) याच्या विक्रमाची बरोबरी केली. उमेशने 55 कसोटी सामने खेळताना 24 षटकार मारले. दुसरीकडे, विराटला कसोटी कारकीर्दीत 24 षटकार मारण्यासाठी 107 कसोटी सामने खेळावे लागलेत. या दोघांपेक्षा जास्त कसोटी षटकार मोहम्मद शमी याच्या नावावर आहेत. त्याने 62 कसोटीत 25 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग अव्वलस्थानी आहे. त्याने 90 षटकार मारले आहेत. तसेच, दुसऱ्या स्थानी एमएस धोनी असून त्याने 78 षटकार मारले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून त्याने 69 षटकार मारलेत. तसेच, रोहित शर्मा चौथ्या स्थानी असून त्याचे 68 षटकार आहेत. चालू कसोटी मालिकेत रोहितकडे सचिनच्या षटकारांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. (most sixes for india in test cricket this cricketer is topper in this list)
भारताकडून कसोटी षटकार मारण्यात उमेशची कोहलीशी बरोबरी
25 षटकार- मोहम्मद शमी (कसोटी सामने- 62)
24 षटकार- विराट कोहली (कसोटी सामने- 107)
24 षटकार- उमेश यादव (कसोटी सामने- 55)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज
भारतात येऊन भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम