भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यासोबत आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश यादवच्या मॅनेजरने त्याची फसवणूक केली असून तब्बल 44 लाख रुपयांना गंडा घातला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार उमेश यादवने या मॅनेजरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. उमेशने त्याच्या मित्रालाच मॅनेजर म्हणून नियुक्त केल्याची माहितीही मिळाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने त्याच्या मित्राला मॅनेजर बनवले होते. नागपूरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी उमेशने त्याला 44 लाख रुपये दिले होते, पण मॅनेजरने ही जमीन उमेशच्या नावावर खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या नावावर खरेदी केले. माध्यमांतील वृत्तांनुसार उमेशच्या या मॅनेजरचे नाव शैलेश ठाकरे (Shailesh Thackeray) आहे. शैलेश ठाकरे मुळचा नागपूरचा राहणारा आहे आणि त्याचे वय 37 वर्ष आहे. माहितीनुसार उमेश यादवने त्याच्या बेरोजगार मित्र शैलेशला रोजगार देण्यासाठी स्वतःचा मॅनेजर बनवले, पण आता याच मित्राने त्याला धोका दिला आहे. 15 जुलै 2015 रोजी उमेशने शैलेला मॅनेजर बनवले होते. दरम्यानच्या कालात त्याने वेगवान गोलंदाजाचा विश्वास जिंकला आणि आता याच विश्वासाचा गैरफायदा घेतला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार उमेश यादवला नागपूरमध्ये जमीन खरेदी करायची होती. त्याने यासाठीच शैलेशला सांगितले आणि जमीन शोधायला लावली. उमेशने सांगितल्याप्रमाणे शैलेशने जमीन शोधली आणि त्याची किंमत म्हणून उमेशला 44 लाख रुपये सांगितले. उमेशचा विश्वासू असल्यामुळे त्याने शैलेशच्या खात्यावर ही रक्कन जमा केली, पण जमीन मात्र त्याच्या नावावर झाली नाही. शैलेशने ही जमीने उमेशच्या नावावर खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या नावावर खरेदी केली. उमेशची फसवणूक केल्यानंतर शैलेशने जमीन उमेशच्या नावावर करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगितले जात आहे. (Along with Umesh Yadav, his own manager cheated Rs 44 lakhs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोडी जबरदस्त! रोहित-गिलने 2023मध्ये गाजवलं वनडे क्रिकेट, 5 डावांमध्ये ठोकल्या चारशेहून अधिक धावा
धोनी अन् विराटसारख्या कर्णधारांच्या यादीत रोहितचाही समावेश, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा आठवा कॅप्टन