---Advertisement---

हिटमॅन नुसतं निकनेम नाही, रोहितने ते आज पुन्हा पुन्हा दाखवुन दिलं

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2019 4:30 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याने या डावात 149 चेंडूत 127 धावा करताना 10 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत.

रोहितने या सामन्यात पहिल्या डावात 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले होते. त्यामुळे रोहितने आता या सामन्यात एकूण 13 षटकार मारले आहेत. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी हा विक्रम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम यांच्या नावावर होता. त्यांनी 1996 ला झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या एका कसोटी सामन्यात 12 षटकार मारले होते.

सध्या विशाखापट्टणमला सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात रोहितने दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारीही रचली आहे. पुजारा 81 धावा करुन बाद झाला.

हा डाव भारताने 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे आणि पहिल्या डावात घेतलेल्या 71 धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपल्याने भारताने 71 धावांची आघाडी घेतली होती.

एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –

13 – रोहित शर्मा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टण, 2019)

12 – वासिम अक्रम (विरुद्ध झिम्बाब्वे, शेखपुरा, 1996)

11- नॅथन ऍस्टल (विरुद्ध इंग्लंड, ख्रिस्टचर्च, 2002)

11 – मॅथ्यू हेडन (विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ, 2003)

11 – ब्रेंडन मॅक्यूलम (विरुद्ध पाकिस्तान, शारजा, 2014)

11 – ब्रेंडन मॅक्यूलम (विरुद्ध श्रीलंका, ख्रिस्टचर्च 2014)

11 – बेन स्टोक्स (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, 2016)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment