चेन्नई। आज चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर २०३ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाने एक खास विक्रम केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत सुरेश रैना दुसरा स्थानावर आला आहे. रैनाने आजपर्यंत आयपीएलमध्ये १७४ षटकार मारले आहेत. हा पराक्रम करताना त्याने रोहितच्या १७३ षटकारांच्या विक्रमला मागे टाकले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने आतापर्यंत २६५ षटकार मारले आहेत. सध्या गेल किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतो.
रैनाने आतापर्यंत आयपीएलमध्ये १६३ सामन्यात ३३.७६ च्या सरासरीने ४५५८ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३१ अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच रैनाने आत्तापर्यंत ४०२ चौकाराही मारले आहेत. तसेच रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे.
रैनाने आजच्या सामन्यात एका षटकाराच्या मदतीने १२ चेंडूत १४ धावा केल्या. फलंदाजी करताना रैनाला क्रॅम्प आल्याने धावा करण्यास त्रास होऊ लागला. अखेर त्याला सुनील नारायणने बाद केले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
ख्रिस गेल- २६५ षटकार
सुरेश रैना – १७४ षटकार
रोहित शर्मा – १७३ षटकार