टी२० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टी२० हा असा क्रिकेट प्रकार आहे जिथे षटकारांचा खुप पाऊस पडताना अनेक वेळा पाहिले गेले आहे. २००७ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध युवराज सिंगच्या एका षटकातील सहा षटकारांची आठवण आजही तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही कायम आहे.
मात्र, तुम्हाला माहित आहे का ? टी२० विश्वचषकातील खरा सिक्सर किंग कोण आहे? टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत पहिल्या पाचामध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१. ख्रिस गेल
टी २० च्या आक्रमक आणि झंझावाती फलंदाजांचा विचार केला तर ख्रिस गेलचे नाव नक्कीच सर्वात आधी येते. हा आक्रमक फलंदाज पुन्हा एकदा टी२० विश्वचषकात आपली चमक दाखवेल. आतापर्यंत गेलने टी२० विश्वचषकात ३३ सामने खेळताना एकूण ६३ षटकार मारले आहेत. त्याने २००७ पासून सर्व टी२० विश्वचषक खेळले आहेत. यात तो दोन वेळा ही वेस्टइंडिजच्या विश्वचषक जेत्या संघाचा सदस्य देखील राहिला आहे.
२. युवराज सिंग
गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताच्या युवराज सिंगचे नाव येते. युवराजने टी -२० विश्वचषकाचे एकूण ३१ सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ३३ षटकार मारले आहेत. युवराज २०१६ मध्ये आपला शेवटचा टी२० विश्वचषक खेळला. तो आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
३. शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉटसनने टी२० विश्वचषकात एकूण २४ सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ३१ षटकार मारलेले. शेन वॉटसन आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने २०२१ मध्ये टी२० विश्वचषक जिंकला आहे.
४. डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने टी२० विश्वचषकाच्या ३० सामन्यात खेळताना ३१ षटकार मारले आहेत. तसेच त्याचा २०२२च्या टी२० विश्वचषकात समावेश असून तो युवराजचा विक्रम मोडू शकतो.
५. रोहित शर्मा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. रोहितने टी२० विश्वचषकाचे आतापर्यंत ३३ सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने ३१ षटकार मारले आहेत. २०२२च्या टी२० विश्वचषकात रोहित पहिल्यांदाच भारताचे आयसीसी स्पर्धेत नेतृत्व करणार आहे.
६. एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या खेळाडूने टी२० विश्वचषकाचे एकूण ३० सामने खेळताना ३० षटकार मारले आहेत. दक्षिण आफ्रिका देखील त्या संघांपैकी एक आहे ज्यांनी अद्याप एकही विश्वचषक जिंकलेला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा निर्भीड सलामीवीर, खासदार ते ग्लोबल मेंटर असा प्रवास करणारा ‘गौतम गंभीर’
बाबू मोशाई, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं..! छोट्याशा कारकिर्दीत प्रतिभेचा ठसा उमटवणारे ५ क्रिकेटपटू