आज आॅस्ट्रेलिया विरुद्ध न्युझीलॅंड तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाने १९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर मार्टीन गप्टीलने १५ चेंडूत २१ धावांची खेळी केली.
हे करताना त्याने १ षटकार आणि २ चौकार खेचले. त्याने आज आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये विक्रमी षटकार मारण्याचा पराक्रम केला.
त्याने आज आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये विक्रमी १०३ वा षटकार मारला. त्याने ७५ सामन्यात ३४.४० सामन्यात २२७१ धावा केल्या आहेत. त्याने हा १०३ वा षटकार मारताना विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या १०३ आंतराष्ट्रीय षटकारांची बरोबरी केली आहे. गेलने ५५ सामन्यात खेळताना आजपर्यंत ३३.८० च्या सरासरीने १५८९ धावा केल्या आहेत.
सध्या गप्टिल आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ ब्रेंडन मॅक्युलम २१४० धावांसह दुसऱ्या क्रमांकावर असून भारताचा विराट कोहली १९८२ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
मार्टिन गप्टिल – १०३ षटकार (सामने ७५)
ख्रिस गेल – १०३ षटकार (सामने ५५)
ब्रेंडन मॅक्युलम – ९१ षटकार (सामने ७१)
शेन वॉटसन – ८३ षटकार (सामने ५८)
डेव्हिड वॉर्नर – ७९ षटकार (सामने ७०)
कॉलिन मुनरो – ७८ षटकार (सामने ४५)
इयान मॉर्गन – ७६ षटकार (सामने ७२)
युवराज सिंग – ७४ षटकार (सामने ५८)
शाहिद आफ्रिदी – ७३ षटकार (सामने ९८)
रोहित शर्मा – ६९ षटकार (सामने ७२)