दक्षिण आफ्रिका संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने पुढील दोन्ही सामने आपल्या खिशात घातले. रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) भारताविरुद्धच्या सामन्यात संघाने 5 विकेट्सने सामना खिशात घातला. त्यांच्या विजयाचा शिल्पकार डेविड मिलर ठरला. मिलरने या सामन्यात चौकार- षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतक झळकावले आणि खास विक्रम रचला.
भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 133 धावा चोपल्या. या धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने 19.4 षटकात 5 विकेट्स गमावत आणि 137 धावा करत पार केले. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात डेविड मिलर (David Miller) मोलाचा वाटा उचलला. त्याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. मिलरने यावेळी 46 चेंडूंचा सामना करताना नाबाद 59 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 4 चौकार मारले. मिलरने यावेळी मारलेल्या 3 षटकारांमुळे त्याच्या नावावर एक खास विक्रम रचला गेला.
Cool and calm ????#INDvSA #T20WorldCup #BePartOfIt pic.twitter.com/rhAbGh8UlB
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 30, 2022
भारताविरुद्ध मारलेल्या 3 षटकारांमुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. त्याने 95 डावांमध्ये 103 षटकार मारले आहेत. या यादीत अव्वलस्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहितने 137 डावांमध्ये 182 षटकार मारले आहेत. त्यानंतर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी मार्टिन गप्टिल असून त्याने 118 डावांमध्ये 173 षटकार मारले आहेत. त्यानंतर ख्रिस गेलने 75 डावांमध्ये 124 षटकार, ऍरॉन फिंचने 102 डावांमध्ये 122 षटकार, ऑयन मॉर्गन याने 107 डावांमध्ये 120 षटकार, विराट कोहली याने 104 डावांमध्ये 115 षटकार, पॉल स्टर्लिंगने 118 डावांमध्ये 115 षटकार, एविन लुईसने 52 डावांमध्ये 111 षटकार, कॉलिन मुन्रोने 62 डावांमध्ये 107 षटकार, डेविड वॉर्नरने 97 डावांमध्ये 105 षटकार, ग्लेन मॅक्सवेलने 88 डावांमध्ये 103 षटकार आणि जोस बटलर याने 91 डावांमध्ये 101 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू (डाव)
182 षटकार- रोहित शर्मा (137 डाव)
173 षटकार- मार्टिन गप्टिल (118 डाव)
124 षटकार- ख्रिस गेल (75 डाव)
122 षटकार- ऍरॉन फिंच (102 डाव)
120 षटकार- ऑयन मॉर्गन (107 डाव)
115 षटकार- विराट कोहली (104 डाव)
115 षटकार- पॉल स्टर्लिंग (118 डाव)
111 षटकार- एविन लुईस (52 डाव)
107 षटकार- कॉलिन मुन्रो (62 डाव)
105 षटकार- डेविड वॉर्नर (97 डाव)
103 षटकार- ग्लेन मॅक्सवेल (88 डावा)
103 षटकार- डेविड मिलर (95 डाव)*
101 षटकार- जोस बटलर (91 डाव)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायदेशात दादागिरी करणाऱ्या भारताला दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात दाखवला इंगा, केला एकदम करेक्ट कार्यक्रम
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी