---Advertisement---

…म्हणून धोनी आणि या गोलंदाजांचे नाते आहे खास!

On: मंगळवार, जानेवारी 15, 2019 12:23 PM
---Advertisement---

ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज(15 जानेवारी) दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आहे.

त्यांचे सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच(6) आणि ऍलेक्स कॅरे(18) हे स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. पण भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने या दोघांची 56 धावांची भागीदारी ख्वाजाला धावबाद करत तोडली.

त्यानंतर काही वेळात पीटर हँड्सकॉम्बही बाद झाला. हँड्सकॉम्बला 20 धावांवर असताना एमएस धोनीने जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले. धोनीचे हे जडेजाच्या गोलंदाजीवरील वनडेतील 18 वे यष्टीचीत होते.

त्यामुळे वनडेत एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर धोनीने सर्वाधिक वेळा यष्टीचीत करण्याच्या यादीत जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर हरभजन सिंग असून त्याच्या गोलंदाजीवर धोनीने 19 वेळा फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. त्याचबरोबर आर अश्विनच्या गोलंदाजीवर धोनीने 15 वेळा यष्टीचीत केले आहे.

धोनीने आत्तापर्यंत वनडे  कारकिर्दीत 78 यष्टीचीत केल्या आहेत. तो वनडेमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक आहे.

या खेळाडूंच्या गोलंदाजीवर धोनीने केले आहेत सर्वाधिक यष्टीचीत-

19 – हरभजन सिंग

18 – रविंद्र जडेजा

15 – आर अश्विन

10 – कुलदीप यादव

09 – युवराज सिंग

महत्त्वाच्या बातम्या – 

जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ

एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास

मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment