---Advertisement---

कोहली फॅन्सच टेन्शन वाढलं, रोहित विराटचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी सज्ज

On: सोमवार, फेब्रुवारी 4, 2019 6:34 PM
---Advertisement---

वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील टी२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करणार आहे.

भारतीय संघाने वनडे मालिका कालच ४-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे टी२० मालिकेतही संघाकडून अशीच अपेक्षा आहे.

या टी२० मालिकेत रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू होण्यासाठी एका अर्धशतकी खेळीची गरज आहे.

रोहितने ९० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १९वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहेत. यात त्याच्या ४ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

या यादीत रोहित विराटबरोबर अव्वल स्थानी आहे. विराटने ६५ सामन्यांत १९वेळा अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत विराट खेळणार नाही. त्यामुळे रोहितला या मालिकेत हा विक्रम करण्याची मोठी संधी आहे.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-

१९- रोहित शर्मा, सामने- ९०

१९- विराट कोहली, सामने- ६५

१६- मार्टिन गप्टील, सामने- ७६

१५- ख्रीस गेल, सामने- ५६

१५- ब्रेंडन मॅक्क्यूलम, सामने- ७१

महत्त्वाच्या बातम्या-

२०१९च्या विश्वचषकात हा खेळाडू असणार रोहित-धवनला पर्याय

१२०४ फलंदाजांनी ज्याचा विचारही केला नसेल तो विक्रम करण्यासाठी रोहित सज्ज

टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण

पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ

मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment