मागील वर्षी टी20 क्रिकेट गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव याने 2023 वर्षातही तीच लय कायम ठेवली आहे. सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खास कामगिरी केली नाही, पण तो पाहुण्या संघाविरुद्धच्या टी20 मालिकेत चांगलाच बरसत असल्याचे दिसत आहे. या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात सूर्यकुमारने दमदार फलंदाजी केली. तसेच, खास विक्रमात आपल्याची नावाची नोंद केली. चला तर सूर्यकुमारने नेमका काय विक्रम केला आहे, पाहूयात…
शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना धावफलकावर 176 धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ गडगडताना दिसला. एकापाठोपाठ नियमित अंतराने भारतीय संघाच्या विकेट्स पडत राहिल्या. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली आणि सोबत विक्रमही रचला.
सूर्यकुमार याने यावेळी फलंदाजी करताना 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यावेळी तो अर्धशतक करण्यापासून 3 धावा दूर राहिला. या धावा चोपताना त्याने 2 षटकार आणि 6 चौकारही मारले. यामुळे सूर्यकुमाारच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 44 डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने चौथा क्रमांक पटकावला. त्याने 44 डावांनंतर 1625 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 46.43च्या सरासरीने आणि 178.77च्या स्ट्राईक रेटने चोपल्या आहेत.
या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. त्याने 44 डावांनंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 135च्या स्ट्राईक रेटने 1709 धावा चोपल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आहेत. बाबरने 130च्या स्ट्राईक रेटने 1686, तर रिझवानने 129च्या स्ट्राईक रेटने 1639 धावे केल्या आहेत. (Most T20I Runs after 44 innings suryakumar yadav in the list)
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 44 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1709 धावा- विराट कोहली (स्ट्राईक रेट- 135)
1686 धावा- बाबर आझम (स्ट्राईक रेट- 130)
1639 धावा- मोहम्मद रिझवान (स्ट्राईक रेट- 129)
1625 धावा- सूर्यकुमार यादव (स्ट्राईक रेट- 177.78)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चुकलास गड्या! संधीचं सोनं करण्यात राहुल त्रिपाठी अपयशी, नावावर नकोशा विक्रमाची नोंद
अफलातून! हवेत उडी मारून वॉशिंग्टनने घेतला ‘सुंदर’ कॅच; बीसीसीआयही म्हणाली, ‘व्वा काय झेल आहे’