---Advertisement---

रोहितचा १००वा टी२० सामना टीम इंडियासाठीही ठरलाय खास, जाणून घ्या कारण

On: शुक्रवार, नोव्हेंबर 8, 2019 10:10 AM
---Advertisement---

राजकोट। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात गुरुवारी (7 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना(2nd T20I)  पार पडला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) पार पडलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला. हा विजय भारतासाठी(India) खास ठरला आहे.

भारताचा टी20 मध्ये धावांचा पाठलाग करताना(while chasing) मिळवलेला हा 41 वा विजय होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे.

हा पराक्रम करताना भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाने टी20मध्ये धावांचा पाठलाग करताना 40 विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ या यादीत पाकिस्तान असून त्यांनी धावांचा पाठलाग करताना 36 विजय मिळवले आहेत.

गुरुवारी भारत-बांगलादेश संघात झालेल्या टी20 सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 153 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 20 षटकात 154 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्य भारताने 15.4 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

भारताकडून प्रभारी कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) 43 चेंडूत 85 धावांची खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे रोहितचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –

41 विजय – भारत

40 विजय – ऑस्ट्रेलिया

36 विजय – पाकिस्तान

28 विजय – इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका

26 विजय – श्रीलंका

महत्त्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---