---Advertisement---

स्मिथ, रुटचं कौतूक करणाऱ्यांनो, विराटचीही आकडेवारी पहाच

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2019 4:15 PM
---Advertisement---

पुणे | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषीत केला. विराट कोहली २५४ धावांवर नाबाद राहिला तर जडेजा ९१ धावांवर बाद झाला.

या सामन्यात विराट कोहलीने  तुफान फटकेबाजी करताना ३३ चौकार तर २ षटकार खेचले.  परंतु फॅब ४ म्हणून क्रिकेट जगतात ओळख असलेल्या स्टिव स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन या अन्य सदस्यांचा एक खास विक्रमही मोडला.

कसोटी डावात सर्वोत्तम धावा करण्याच्या विक्रमात फॅब ४मध्ये विराट अव्वल स्थानी आला आहे. त्याच्या सर्वोत्तम धावा २५४आहेत. विराटने जो रुट (२५४), केन विलियम्सन (२४२*) आणि स्टिव स्मिथ (२३९) यांना या विक्रमात मागे टाकले आहे.

याचबरोबर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही विराट अव्वल स्थानी आला आहे.

कसोटीत फॅब ४ सदस्यांच्या धावा-

७०५४- विराट कोहली, सामने- ८१

७०४३- जो रुट, सामने- ८६

६९७३- स्टिव स्मिथ, सामने- ६८

६१६३- केन विलियम्सन, सामने- ७४

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment