सिडनी। येत्या ७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यासाठी सोमवारी(४ जानेवारी) दोन्ही संघ सि़डनी येथे पोहचले आहेत.
या मैदानाचा इतिहास पाहाता आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात या मैदानावर १२ कसोटी सामने झाले आहेत. त्यातील ५ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर १ सामना भारताने जिंकला आहे. त्याचबरोबर ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. असे असले तरी भारतीय फलंदाजांनी या मैदानावर दबदबा ठेवला आहे.
ऑस्ट्रेलिया-भारत संघात सिडनीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांच्या बाबत विचार केल्यास सर्वाधिक धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ५ सामन्यांतील ९ डावात १५७ च्या सरासरीने ७८५ धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. लक्ष्मणने ४ सामन्यात ७८.४२ च्या सरासरीने ५४९ धावा केल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने भारताविरुद्ध या मैदानात ४ सामन्यांतील ६ डावात ८०.६० च्या सरासरीने ४०३ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा –
७८५ धावा – सचिन तेंडुलकर
५४९ धावा – व्हीव्हीएस लक्ष्मण
४०३ धावा – रिकी पाँटिंग
३८७ धावा – जस्टिन लँगर
३३६ धावा – मायकल हसी
३३० धावा – मायकल क्लार्क
२९२ धावा – डेविड बून
२८३ धावा – राहुल द्रविड
२४८ धावा – विराट कोहली
सर्वाधिक शतके –
ऑस्ट्रेलिया-भारत संघात सिडनीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन आणि लक्ष्मण या दोघांच्या नावावर संयुक्तपणे आहे. या दोघांनीही या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी ३ कसोटी शतके केली आहेत. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डेविड बून, मायकल हसी, जस्टीन लँगर आणि रिकी पाँटिंग हे आहेत. त्यांनी या मैदानावर भारताविरुद्ध प्रत्येकी २ शतके केली आहेत.
क्लार्कचे त्रिशतक –
सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्यामध्ये जरी भारतीय खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला असला तरी ऑस्ट्रेलिया-भारत संघात सिडनीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम मायकल क्लार्कच्या नावावर आहे. त्याने साल २०१२ मध्ये नाबाद ३२९ धावांची खेळी भारताविरुद्ध केली होती. ही त्याची कारकिर्दीतीलही सर्वोच्च खेळी ठरली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
NZ vs PAK 2nd Test: विलियम्सन-निकोल्सची अभेद्य भागीदारी, दुसर्या दिवसअखेर न्यूझीलंड मजबूत स्थितीत
IND vs AUS : सिडनी कसोटीआधी खास आकडेवारी, पाहा कोणाचा राहिलाय दबदबा
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांचा दबदबा; शतक सोडा द्विशतकेही ठोकलीत याच मैदानावर






