---Advertisement---

ही एक विकेट घेत इशांत शर्माने आशिया खंडाबाहेर रचला इतिहास

On: रविवार, सप्टेंबर 1, 2019 10:01 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 117 धावांवर संपुष्टात आला आहे.

त्यामुळे भारताने 299 धावांनी आघाडी घेतली आहे. या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इशांतने वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक शामर्ह हॅमिल्टनची विकेट घेतली. याबरोबरच इशांत आशिया खंडाबाहेर सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आशिया खंडाबाहेर 156 विकेट्स झाल्या आहेत.

हा पराक्रम करताना इशांतने कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर घेतलेल्या 155 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. त्याने 200 विकेट्स आशिया खंडाबाहेर घेतल्या आहेत. आशियाबाहेर 200 विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. पण आता त्याच्या पाठोपाठ कपिल देव यांना मागे टाकत इशांतने दुसरे स्थान मिळवले आहे.

#आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज –

156 – इशांत शर्मा (47 सामने)

155 – कपिल देव (45 सामने)

147 – झहिर खान (38 सामने)

117 – जवागल श्रीनाथ (31 सामने)

100 – मोहम्मद शमी (28 सामने)

#आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

200 – अनिल कुंबळे (50 सामने)

156 – इशांत शर्मा (46 सामने) 

155 – कपिल देव (45 सामने)

147 – झहिर खान (38 सामने)

123 – बिशनसिंग बेदी (34 सामने)

117 – हरभजन सिंग (32 सामने)

117 – जवागल श्रीनाथ (31 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हरभजन सिंग, इरफान पठाणने बुमराहचे असे केले हॅट्रिक क्लबमध्ये वेलकम

हनुमा विहारीने या व्यक्तीला केले पहिले शतक समर्पित, पहा व्हिडिओ

बुमराह म्हणतो, विराटमुळे मला हॅट्रिक मिळाली, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment