---Advertisement---

कर्णधार कोहलीने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे

On: बुधवार, ऑक्टोबर 2, 2019 1:07 PM
---Advertisement---

आजपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे. हा त्याचा कसोटी कर्णधार म्हणून 49 वा कसोटी सामना आहे.

त्यामुळे विराटने भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली आहे. गांगुलीनेही भारताचे 49 कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यामुळे या यादीत आता गांगुली आणि विराट संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने भारताचे 60 कसोटी सामन्यात नतृत्व केले आहे.

आजपासून विशाखापट्टणम येथे सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाला योग्य ठरवत भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अगरवालने भारताला चांगली सुरुवात दिली आहे. या दोघांनीही नाबाद अर्धशतके केली आहेत.

भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू- 

60 – एमएस धोनी

49* – विराट कोहली

49 – सौरव गांगुली

47 – मोहम्मद अझरुद्दीन

47 – सुनील गावस्कर

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

अर्धशतक करताच हिटमॅन रोहित शर्माचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

जेव्हा विराट कोहली पत्रकारांना करतो ट्रोल, पहा व्हिडिओ

टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू होणार संघाबाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment