उद्यापासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी आज(1 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली उपस्थित होता.
या पत्रकारपरिषदेसाठी अनेक पत्रकार उपस्थित असल्याने विराटने पत्रकारांबदद्ल एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच पत्रकारांना पाहून आश्चर्यचकित झालेला विराट गमतीने म्हणाला, ‘कोणीही टी20 साठी येत नाही, सगळे त्यावेळी टी20चा आनंद घेत असतात.’
विराटने दिलेल्या या प्रतिक्रियाचा व्हिडिओ बीसीसीआयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/B3Ekj0Xgm0T/
उद्यापासून सुरु होणारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील ही कसोटी मालिका आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिपचाही भाग असणार आहे.
भारताची ही यावर्षीची मायदेशातील पहिलीच कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे. हा सामना विशाखापट्टनममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए- वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू होणार संघाबाहेर
–जसप्रीत बुमराह उपचारासाठी जाणार ‘या’ देशात
–हरभजनच्या त्या ट्विटवर युवराज सिंगने ‘हे’ उत्तर देत केले टीम इंडियाला ट्रोल