Loading...

जसप्रीत बुमराह उपचारासाठी जाणार ‘या’ देशात

2 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्याऐवजी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी उमेश यादवची बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड केली आहे.

बुमराहला पाठिला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी बीसीसीआय बुमराहला लंडनला पाठवणार आहे.

याबद्दल बीसीसीआच्या एका अधिकारीने नाव न सांगण्याच्या अटीवरुन पीटीआयला माहिती दिली की ‘बुमराहच्या दुखापतीवर उपचारासाठी बीसीसीआय त्याला लंडनला पाठवणार आहे. यासाठी बुमराहबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य फिजिओथेरपिस्ट आशिष कौशिक हे देखील लंडनला जातील.’

‘बुमराह तीन वेगवेगळ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे, यासाठी बीसीसीआयने वैद्यकीय तज्ज्ञांची वेळ घेतली आहे.’

‘बुमराह 6 किंवा 7 ऑक्टोबरला आठवडाभरासाठी इंग्लंडला जाणे अपेक्षित आहे. तीन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.’

Loading...

जसप्रीत बुमराह  गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत 12 कसोटी सामन्यांत 62 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 58 वनडे सामन्यांत 103 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर 42 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 51 विकेट्स घेतले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या – 

हरभजनच्या त्या ट्विटवर युवराज सिंगने ‘हे’ उत्तर देत केले टीम इंडियाला ट्रोल

…म्हणून रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचे नाते आहे खास!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एमएस धोनीचे केले या शब्दात कौतुक

You might also like
Loading...