बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. यापूर्वी पहिल्या कसोटीत भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली होती. आता अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली येथे दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. हा सामना एका भारतीय खेळाडूसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आहे.
भारतीय संघाचा दमदार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याचा 100वा कसोटी सामना खेळत आहे. तो 100 कसोटी सामना खेळणारा भारताचा 13वा खेळाडू आहे. 100व्या कसोटीत फलंदाजीला येण्यापूर्वी पुजाराने भारतीय संघाकडून 99 कसोटी सामन्यातील 169 डावांमध्ये फलंदाजी करताना 44.16च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. कसोटीत 206 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने कसोटीत भारताकडून 19 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली आहेत.
Cheteshwar Pujara joins the exclusive club 🙌#INDvAUS | #WTC23 pic.twitter.com/pNcjuCM5EZ
— ICC (@ICC) February 17, 2023
पुजाराव्यतिरिक्त भारताकडून 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने भारताकडून एकूण 200 कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्याने भारताकडून 163 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण असून त्याने 134 कसोटी सामने खेळले आहेत. यानंतर अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावसकर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (106*), ईशांत शर्मा (105), हरभजन सिंग (103) आणि वीरेंद्र सेहवाग (103) यांनीही भारताकडून 100 कसोटी सामने खेळण्याचा कारनामा केला आहे. (Most Tests for India cheteshwar pujara plays 100th test see list)
भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू
200- सचिन तेंडुलकर
163- राहुल द्रविड
134- व्हीव्हीएस लक्ष्मण
132- अनिल कुंबळे
131- कपिल देव
125- सुनील गावसकर
116- दिलीप वेंगसरकर
113- सौरव गांगुली
106- विराट कोहली*
105- ईशांत शर्मा
103- हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग
100- चेतेश्वर पुजारा*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच