इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League 2023) ही जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित असलेली टी20 स्पर्धा आहे. आयपीएलचा हा 16वा हंगाम असून यावेळी प्रत्येक संघ आणि नवीन खेळाडू स्वला: सिद्ध करण्यासाठी लढत आहेत. आयपीएल 2023चा पहिला सामना 31 मार्च 2023 ला खेळला गेला. दररोजच्या होत असलेल्या सामन्यांमध्ये आपल्याला चुरशीची लढत पहायला मिळत आहे. जस-जसे दिवस अंतिम फेरीकडे जात आहेत, तसतशी चाहत्यांची अपेक्षा शिगेला पोहचत आहे. मात्र, काही संघ असेही आहेत, जे 100 धावा पूर्ण करण्याआधीच पव्हेलियनमध्ये परतले. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थान रॉयल्स होय. राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023च्या 60व्या सामन्यात आमने-सामने होते. हा सामना बेंगलोरने 112 धावांनी जिंकला. या विजयासह त्यांनी खास विक्रम रचला.
झाले असे की, आयपीएल 2023 स्पर्धेतील 60व्या सामन्यात बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाचा डाव 10.3 षटकात अवघ्या 59 धावांवर संपुष्टात आला. यावेळी राजस्थानला पराभूत करताच बेंगलोर संघाने जबरदस्त विक्रम रचला.
For his incredible bowling spell that powered #RCB to a convincing win in Jaipur, @WayneParnell receives the Player of the Match award 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/NMSa3HfybT #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/fyGAUsLS0q
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
बेंगलोर संघाचा विक्रम
बेंगलोर संघ हा आयपीएलमध्ये विरोधी संघाला सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत रोखणारा संघ बनला. बेंगलोरने मुंबई इंडियन्सच्या विक्रमाचीही बरोबरी केली. मुंबईनेही आयपीएलमध्ये विरोधी संघांना आतापर्यंत 100 धावांच्या आत रोखले आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. त्यांनी विरोधी संघांना आतापर्यंत 6 वेळा, तर चेन्नई सुपर किंग्स या चार वेळच्या आयपीएल विजेत्या संघाने विरोधी संघांना 5 वेळा 100 धावांचा आकडा पार करण्यापासून रोखले आहे.
विरोधी संघांना सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत रोखणारे संघ
7 वेळा- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर*
7 वेळा- मुंबई इंडियन्स
6 वेळा- कोलकाता नाईट रायडर्स
5 वेळा- चेन्नई सुपर किंग्स
या विजयासह बेंगलोर संघाने 12 गुण पटकावत गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. आता पुढील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत बेंगलोर संघ प्ले-ऑफमध्ये जातो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Most times Bowled out opponents less than 100 in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
भारतीय दिग्गजाची संघातून केलेली हाकालपट्टी, ब्लॅकमेल करून साधला फायदा; मैदानावर परतताच ठोकलं द्विशतक
अफलातून! मॅक्सवेलने सिक्स मारत झळकावली फिफ्टी, सामन्यातील सर्वात लांब षटकार तुम्हीही पाहाच