---Advertisement---

श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज रोहित शर्माचा पिच्छा काही सोडेना; तब्बल ६ वेळा दाखवलाय तंबूचा रस्ता

Rohit-Sharma
---Advertisement---

रविवारी (२७ फेब्रुवारी) हिमाचल प्रदेशच्या धरमशाला मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १४६ धावां ठोकल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) आले होते. मात्र, यावेळी पहिल्या सामन्यासारखी खास कामगिरी करण्यात रोहित अपयशी ठरला. त्याला दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजाने बाद केले होते, त्याच गोलंदाजांने त्याला तिसऱ्या टी२० सामन्यात तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच त्याने पुन्हा एकदा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

श्रीलंकेने दिलेल्या १४६ धावांचे आव्हान पार करण्यासाठी रोहित आणि सॅमसन मैदानावर आले होते. श्रीलंकेकडून डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) आला होता. त्याने आपले पहिले ३ चेंडू रोहितला टाकले, पण त्यावर रोहितने एकही धाव घेतली नाही. मात्र, जसा त्याने चौथा चेंडू टाकला, तसा तो रोहितने फटकवला, पण तो चेंडू थेट चमिका करुणारत्नेच्या हातात गेला. त्यामुळे रोहित तंबूत परतला.

रोहितची विकेट घेतल्यानंतर दुष्मंताच्या नावावर एक मोठा विक्रम झाला. चमीरा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एखाद्या ठराविक फलंदाजाला ६ वेळा बाद करणारा पहिला आणि एकमेव गोलंदाज बनला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ वेळा रोहित शर्माला बाद केले आहे.

यामध्ये त्याने टीम साऊदी, इश सोधी, जेसन बेहरेन्डोर्फ, ट्रेंट बोल्ट आणि ज्युनिअर दाला यांसारख्या जबरदस्त गोलंदाजांना मागे टाकले आहे. साऊदीने आतापर्यंत रोहितला ४ वेळा, तर सोधी, बेहरेन्डोर्फ, बोल्ट आणि दाला यांनी प्रत्येकी ३ वेळा रोहितला बाद केले आहे.

रोहित शर्माच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३२ चेंडूंचा सामना करताना ४४ धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये १ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात रोहित फक्त एका धावेवर बाद झाला होता.

आता भारत आणि श्रीलंका संघातील पहिल्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे.

रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
६ वेळा- दुष्मंता चमीरा*
४ वेळा- टीम साऊदी
३ वेळा- इश सोधी
३ वेळा- जेसन बेहरेन्डोर्फ
३ वेळा- ट्रेंट बोल्ट
३ वेळा- ज्युनिअर दाला

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsSL, 3rd T20I: जखमी इशानच्या जागी सॅमसनची वर्णी, तर ‘या’ ३ गोलंदाजांना विश्रांती; पाहा दोन्ही संघ

‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर

श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---