भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. हा सामना भारतीय संघासोबतच अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. पुजारा त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 100वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात त्याच्याकडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा होती. मात्र, तो अपेक्षा पूर्ण करण्यात असमर्थ ठरला. त्याच्या नावावर शंभराव्या कसोटीतच नकोशा विक्रमाची नोंद झाली. चला पाहूयात काय आहे तो नकोसा विक्रम…
दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 78.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 263 धावा केल्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या विकेट्स झटपट पडल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) भारताचा डाव सांभाळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तो यात अपयशी ठरला. त्याने यादरम्यान 7 चेंडू खेळले, पण एकही धाव काढू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून 20वे षटक टाकत असलेल्या नेथन लायन (Nathan Lyon) याने याने पुजाराला चौथ्या चेंडूवर पायचीत बाद केले.
Third wicket for Nathan Lyon as he gets rid of Cheteshwar Pujara for 0.#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/HS93GIyEwS pic.twitter.com/BhSsIqgcCt
— ICC (@ICC) February 18, 2023
चेतेश्वर पुजाराचा नकोसा विक्रम
लायनकडून बाद होताच पुजाराच्या नावावर नकोसा विक्रम (Cheteshwar Pujara Unwanted Record) नोंदवला गेला. तो कसोटी क्रिकेटमध्ये नेथन लायन याच्याविरुद्ध फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज ठरला. त्याने लायनविरुद्ध आतापर्यंत 11 वेळा विकेट गमावली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे आहे. तो लायनविरुद्ध फलंदाजी करताना 10 वेळा बाद झाला आहे. यानंतर यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी तीन खेळाडू आहेत. ते म्हणजे बेन स्टोक्स (Ben Stokes), मोईन अली (Moeen Ali) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) होय. या तिघांनीही आतापर्यंत प्रत्येकी 9 वेळा लायनविरुद्ध विकेट गमावली आहे. (Most times getting out against Nathan Lyon in Test)
कसोटीत नेथन लायनविरुद्ध सर्वाधिक वेळा बाद होणार खेळाडू
11- चेतेश्वर पुजारा*
10- अजिंक्य रहाणे
9- बेन स्टोक्स
9- मोईन अली
9- स्टुअर्ट ब्रॉड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टोक्सचा भीम पराक्रम! कसोटीत केली कुणालाही न जमलेली कामगिरी; प्रशिक्षक मॅक्युलमचाही विक्रम मोडला
चेतन शर्मांनंतर कोण होणार भारताचा नवीन मुख्य निवडकर्ता? टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचं नाव चर्चेत