---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने रचला विक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या ‘इतक्या’ विकेट

On: रविवार, डिसेंबर 11, 2022 7:52 PM
Nathan Lyon
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज संघाचा 419 धावांनी दारुण पराभव केला. अशातच ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन याने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला. कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध एडिलेड येथे खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला.

नॅथन लायन (Nathan Lyon) याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या डावात तीन विकेट्स मिळवल्या तर दुसऱ्या डावात एक विकेट मिळवली. आल्झारी जोसेफ (Joseph Alzari) याला बाद करताच त्याचे 450 विकेट्स पूर्ण झाल्या. आता तो 450 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 8व्या क्रमांकावर आहे.

नॅथन लायन याच्या112 सामन्यात 450 विकेट्स झाल्या
लायन ऑस्ट्रेलियाचा एक चांगला फिरकीपटू आहे आणि बऱ्याच वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत 112 सामन्यातील 211 डावात 450 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 21 वेळा 5 विकेट हॉल आणि 3 वेळा 10 विकेट हॉल (कसोटी सामन्याचेे दोन्ही डाव मिळून) पूर्ण केला. वेस्ट इंडिज विरुद्ध पर्थ कसोटी सामन्यात त्याने 442 विकेट्सचा विक्रम मोडला होता आणि आता त्याचे 450 विकेट झाल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचे माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muthayya Muraleedharan) यांच्या नावावर आहे. मुरलीधरन यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत खेळलेल्या 133 सामन्यात 800 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्यांनी 67 वेळा 5 विकेट हॉल तर 22 वेळा 10 विकेट हॉल (कसोटीमधील दोन्ही डाव मिळून) पूर्ण केला. तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) यांचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. त्यांनी आपल्या स्पिन गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला अनेक सामने जिंकून दिले. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या. तसेच भारताच्या अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत 132 सामन्यात 619 विकेट घेतल्या होत्या.(Nathan Lyon has completed 450 wickets in Test Cricket and placed on 8th position in the list of most wicket takers)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याच्या विक्रमाची केली बरोबरी, त्याच्याकडूनच मिळाली दाद; मॅक्युलमसमोर स्टोक्सचा नाद खुळा पराक्रम
‘आता 200 धावा केल्या आहेत…’, विश्वचषकातील निवडीच्या प्रश्नावर ईशानचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---