सिडनी। आजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 303 धावा केल्या आहेत.
या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने नाबाद शतकी खेळी केली आहे. तो पहिल्या दिवसाखेर 250 चेंडूत 130 धावांवर नाबाद आहे. त्याने 199 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले आहे. पुजाराचे हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक ठरले आहे.
याबरोबरच त्याने या मालिकेत तीन शतके आणि एका अर्धशतकासह 400 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पुजाराने या मालिकेत 7 डावात 76.33 च्या सरासरीने 458 धावा केल्या आहेत. यामुळे त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मॅथ्यू हेडन यांच्या एका खास विक्रमाशी बरोबरी केली आहे.
पुजाराने भारत – ऑस्ट्रेलिया संघांमध्ये होत असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (कसोटी मालिका) 400 धावांचा टप्पा पार करण्याची तिसरीवेळ आहे. त्याने याआधी 2012-13 आणि 2016-17 मध्ये भारतात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 400 धावांचा टप्पा पार केला होता.
तसेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये याआधी तीन वेळा 400 धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर आणि मॅथ्यू हेडन यांनाच पार करता आला आहे.
सचिनने 1997-98 आणि 2010-11 मध्ये भारतात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 400 धावांचा टप्पा पार केला होता, तर2007-08 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 400 धावांचा टप्पा पार केला होता.
हेडनने 2000-01 मध्ये भारतात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 400 धावांचा टप्पा पार केला होता. तसेच त्याने 2003-04 आणि 2007-08 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 400 धावांचा टप्पा पार केला होता.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वेळा 400 धावांचा टप्पा पार करणारे फलंदाज-
3 – चेतेश्वर पुजारा (2012-12, 2016-17, 2018-19)
3 – सचिन तेंडुलकर (1997-98, 2007-08, 2010-11)
3 – मॅथ्यू हेडन (2000-01, 2003-04,2007-08)
महत्त्वाच्या बातम्या:
–आता या दिग्गजांच्या यादीत पुजाराचे नाव गर्वाने घेतले जाणार
–विराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग
–या कारणामुळे टीम इंडिया १०० टक्के जिंकणार सिडनी कसोटी