भारतीय संघात एकापेक्षा एक गोलंदाजांचा भरणा आहे. भारतीय गोलंदाज जगाच्या कुठल्याही मैदानावर विरोधी संघाच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करण्याची क्षमता राखतात. या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव याच्या नावाचाही समावेश होतो. याच कुलदीपने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात जलवा दाखवला. विशेष म्हणजे, या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची विकेट काढताच, त्याने खास पराक्रमही गाजवला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या वनडेत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने 83 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. या तिन्ही विकेट्स हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने घेतल्या होत्या. त्यानंतर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या विकेट्सचे सत्र सुरू झाले. कुलदीपने 25व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वैयक्तिक पहिली आणि डावातील चौथी विकेट डेविड वॉर्नर याच्या रूपात घेतली. त्याने वॉर्नरला 23 धावांवर बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट त्याने 29व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मार्नस लॅब्युशेन याला बाद करून घेतली. लॅब्युशेन यावेळी 28 धावांवर बाद झाला.
Bamboozled 💥
An epic delivery from @imkuldeep18 to get Alex Carey out!
Australia 7⃣ down now.
Follow the match ▶️ https://t.co/eNLPoZpSfQ #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/DCNabrEGON
— BCCI (@BCCI) March 22, 2023
त्यानंतर कुलदीपने तिसरी विकेट अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याला 37व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद करून घेतली. स्टॉयनिस यावेळी 25 धावांवर बाद झाला. या तीन विकेट्स काढताच कुलदीप हा वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. कुलदीपने 3 विकेट्स घेताच त्याच्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 27 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 26 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या वनडेत 24 विकेट्स आहेत.
वनडेत कुलदीप यादव याच्या एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स
27 विकेट्स- ऑस्ट्रेलिया*
26 विकेट्स- वेस्ट इंडिज
24 विकेट्स- दक्षिण आफ्रिका
कुलदीपव्यतिरिक्त सामन्यात हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, अक्षर पटेल याने 2 विकेट्स, तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट आपल्या नावावर केली. हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकताच भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करेल.
यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने 2-1ने खिशात घातली होती. (Most wickets by Kuldeep Yadav against an opponent in ODIs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चालू सामन्यात राहुलने का सोडले मैदान? किशनला सांभाळावी लागली यष्टीरक्षणाची जबाबदारी
आठ महिने आधीच कोच द्रविड यांनी उघड केला टीम इंडियाचा ‘वर्ल्डकप प्लॅन’! म्हणाले, “17-18 खेळाडू…”