भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला मोहम्मद शमी आज (03 सप्टेंबर) 34वा वाढदिवस साजरा करत आहे. शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघात परतू शकलेला नाही. दुखापतीमुळे शमीवर एकदिवसीय विश्वचषकानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. दरम्यान, आज या बातमीद्वारे जाणून घेऊयात मोहम्मद शमीच्या अशाच काही विक्रमांबद्दल जे आतापर्यंत कोणताही भारतीय गोलंदाज साधू शकलेला नाही.
मोहम्मद शमी हा एकदिवसीय विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकून शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ही कामगिरी केली होती. शमीने भारतासाठी 18 विश्वचषक सामने खेळताना 55 बळी घेतले आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. शमीने केवळ 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या.
शमीने 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 17 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने 14 विकेट घेतल्या. त्यानंतर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने 24 विकेट्स घेऊन भारतीय संघाला फायनल पर्यंत पोहचवण्यात मोठे योगदान दिले होते. या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत शमीने गोलंदाजाने 7 विकेट्स घेतल्या होत्या.
शमीने 2019 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. एकदिवसीय विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
खरे तर मोहम्मद शमी हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 122 डावांमध्ये त्याने 27.71 च्या सरासरीने 229 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय शमीने एकदिवसीय सामन्यांच्या 100 डावांमध्ये 23.68 च्या सरासरीने 195 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने उर्वरित टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 23 डावांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
Champions Trophy; पाकिस्तानात जाण्याबाबत BCCI ची भूमिका समोर, पाहा मोठे अपडेट
3 कर्णधार ज्यांना आयपीएलमध्ये कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही
दुर्दैवच..! पॅरालिम्पिकमधील भारताच्या सुवर्णपदकाची चर्चा का होत नाही?