---Advertisement---

भारताविरुद्ध ४ विकेट्स घेत टीम साऊथीने केलाय मोठा पराक्रम!

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 9:07 AM
---Advertisement---

वेलिंग्टन। कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपूष्टात आला. या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊथीने 20.1 षटके गोलंदाजी करताना 49 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

त्याच्या आता न्यूझीलंडमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 153 सामन्यांमध्ये 299 विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे त्याने न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या डॅनिएल विट्टोरीची बरोबरी केली आहे. विट्टोरीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 193 सामन्यांमध्ये 299 विकेट्स घेतलेले आहेत.

त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीतही साऊथीने विट्टोरीला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. न्यूझीलंडमध्ये साऊथीने 39 कसोटीत 161 विकेट्स घेतल्या आहेत. तर विट्टोरीने 57 कसोटीत 159 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर सर रिचर्ड हॅडली आहेत. त्यांनी न्यूझीलंडमध्ये 43 कसोटीत 201 विकेट्स घेतल्या आहेत.

सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात पहिल्या डावात साऊथी व्यतिरिक्त काईल जेमिसननेही 4 विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.

#न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज – 

299 – टीम साऊथी

299 – डॅनिएल विट्टोरी

274 – ट्रेंट बोल्ट

#न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज – 

201 – रिचर्ड हॅडली

161 – टीम साऊथी

159 – डॅनिएल विट्टोरी

https://twitter.com/Maha_Sports/status/1231047880565235712

https://twitter.com/Maha_Sports/status/1230845564486590464

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---