---Advertisement---

MPL लिलावाचा थरार सुरू! पहिल्या विभागात हे खेळाडू ठरले महागडे, वाचा सविस्तर

On: मंगळवार, जून 6, 2023 3:29 PM
---Advertisement---

प्रथमच आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. या लिलावात सहा फ्रेंचाईजींनी भाग घेतला. या लिलावात 319 खेळाडूंनी नोंदणी केली होती. अ गटातील पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात फलंदाज नौशाद शेख याने सर्वाधिक रक्कम मिळवली.

पुणे येथील वेस्टीन हॉल येथे पार पडलेल्या या लिलावात सर्वात पहिली बोली फलंदाज तरणजीत धिल्लॉं याच्यावर लागली. कोल्हापूर टस्कर्स संघाने त्याला 1 लाख 60 हजारांच्या किमतीत विकत घेतले. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर व यष्टीरक्षक निखिल नाईक यांच्यावर रत्नागिरी जेट्सने अनुक्रमे 4 लाख 60 हजार व 3 लाख 40 इतकी बोली लावली. अनुभवी अंकित बावणे 2 लाख 80 हजारांत कोल्हापूरचा खेळाडू बनला. आक्रमक फलंदाज नौशाद शेख याच्यावर कोल्हापूर टस्कर्सने 6 लाखांची सर्वाधिक बोली लावली.

बातमी अपडेट होत आहे…

(MPL 2023 Auction Naushad Shaikh And This Players Goes Costliest Maharashtra Premier League)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---