महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चे बिगुल वाजले असून (MPL 2025) सर्व संघ आपली अंतिम तयारी करत आहेत. यंदाच्या हंगामाला 4 जून पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पुण्याच्या एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम होणार आहे. स्पर्धेपूर्वी सर्व संघांनी आपला ताफा (संघ) मजबूत बनवला आहे. ज्यामध्ये नाशिक संघाचाही समावेश आहे. नाशिक संघ बलाढ्य स्क्वॉडसह मैदानात उतरणार आहे. अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे.
संघाची प्रशांत सोलंकीकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, त्याच्या नेतृत्वात नाशिक टायटन्सकडून यंदा जबरदस्त कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवान मारा, अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटूंनी सजलेला हा संघ साखळी फेरीत सर्व संघांसमोर मोठं आव्हान उभं करणार आहे. संघांमध्ये अनुभवी खेळाडूंचा भडीमार आहे.
एमपीएल 2025 साठी ईगल नाशिक टायटन्स संघ – प्रशांत सोलंकी (कर्णधार), मुकेश चौधरी, मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, अथर्व काळे, रणजीत निकम, अक्षय वायकर, कौशल तांबे, दिग्विजय देशमुख, साहिल पराख, सिध्दांत दोशी, रेहान खान, हरी सावंत, रझाक फल्लाह, योगेश डोंगरे, मनोज इंगळे, रोहन दामले, पृथ्वीराज कंद, बालकृष्ण काशिद, आदर्श मणुरे, सुश्रुत सावंत (MPL 2025: Eagle Nashik Titans Squad)
विनामूल्य प्रवेश
स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे येथे खेळवले जाणार आहेत. यासंदर्भात एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. (Free Entry For All MPL/WMPL Matches)
घरबसल्या थेट सामना – तुमच्या स्क्रीनवर!
ज्यांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही, त्यांच्यासाठीही खुशखबर आहे की, MPL 2025 मधील सर्व सामने ‘JioHotstar’ या OTT अॅपवर तसेच ‘Star Sports 2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे घरबसल्या मोबाईलवर, टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर क्रिकेटचा रोमांच पाहता येणार आहे. . (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioHotstar)






