---Advertisement---

MPL 2025: सोलंकीच्या फिरकीत कोल्हापूर टस्कर्स संघ विखुरला; नाशिकला 135 धावांचं लक्ष्य

On: सोमवार, जून 9, 2025 12:23 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 (MPL) मध्ये आजचा सामना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. टॉस गमावलेल्या कोल्हापूर संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदनात उतरला. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली.

कोल्हापूरच्या डावाची सुरुवात खराब झाली आणि संघ सतत विकेट गमावत राहिला. पहिले 10 षटकातच कोल्हापूरने 5 बळी गमावले होते. 19 व्या षटकापर्यंत संघाची अवस्था 107/9 अशी बिकट होती. पण शेवटच्या षटकात आनंद ठेंगेने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 20 चेंडूत 35 धावा केल्या. विशेषतः शेवटच्या षटकात मुकेश चौधरीवर त्याने केलेल्या 27 धावांनी संघाला काहीशी उभारी दिली आणि 134 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीकांत मुंढेने संयमाने फलंदाजी करत 29 चेंडूत 27 धावा केल्या.

गोलंदाजीत ईगल नाशिक टायटन्सकडून प्रशांत सोलंकीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने आपल्या 4 षटकांत फक्त 13 धावा देत 4 महत्वाचे बळी घेतले आणि कोल्हापूरच्या डावाला खिंडार पाडले. त्याला अर्शिन कुलकर्णीनेही छान साथ दिली. त्याने 4 षटकात 27 धावा देत 2 बळी टिपले.

सामन्याच्या पहिल्या डावात ईगल नाशिक टायटन्सने स्पष्ट वर्चस्व गाजवलं. आता त्यांच्यासमोर विजयासाठी 135 धावांचं माफक लक्ष्य आहे. त्यांच्या फलंदाजांकडे पाहता हे लक्ष्य सहज गाठता येण्यासारखं असलं, तरी कोल्हापूरच्या गोलंदाजांनी जर लवकर विकेट घेतल्या तर सामना अटीतटीचा ठरू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---