---Advertisement---

‘मिस्टर आयपीएल’ रैनाचा आणखी एक पराक्रम, आयपीएल इतिहासात ठोकले ‘इतके’ चौकार

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 1:58 AM
---Advertisement---

बुधवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. सीएसकेने ७ गडी राखून सामना खिशात घातला. गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीनंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांनी अर्धशतके झळकावत संघाचा सलग पाचवा विजय साकारला. या सामन्यात सीएसकेचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने तीन चौकार ठोकत एका आगळ्या-वेगळ्या यादीत नाव समाविष्ट केले.

रैनाची नाबाद खेळी
सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेले १७२ धावांचे आव्हान ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांच्या अर्धशतकांमुळे सीएसकेच्या आवाक्यात आले. मात्र ऋतुराज, प्लेसिस व‌ मोईन अली नियमित अंतराने बाद झाल्यामुळे सीएसकेच्या डावाची लहानशी घसरगुंडी झाली. परंतु, सुरेश रैना व रविंद्र जडेजा यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रैना १७ तर जडेजा ७ धावांवर नाबाद राहिला.

रैनाने गाठला हा पल्ला
आपल्या छोटेखानी खेळीदरम्यान रैनाने तीन चौकार खेचले. त्याचबरोबर, त्याने आयपीएलमध्ये ५०० चौकार मारण्याचा पराक्रम केला. आता त्याच्या नावे ५०२ चौकार जमा झाले. यासोबत त्याने २०२ षटकारही लगावले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत तब्बल ६२४ चौकार खेचले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ५२५ चौकान जमा आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या नावेदेखील ५२१ चौकारांची नोंद आहे.

मि. आयपीएल म्हणून ओळखला जातो रैना
सुरेश रैना याला मिस्टर आयपीएल म्हणून संबोधतात. त्याने आत्तापर्यंत १९९ आयपीएल सामने खेळताना ५४८९ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये ३९ अर्धशतके व १ शतकाचा समावेश असून, त्याची सरासरी ३३ पेक्षा अधिक आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये वॉर्नरने ‘हा’ विक्रम करत मिळवले गेल, डिविलियर्स, पोलार्ड या परदेशी खेळाडूंच्या पंक्तीत जागा

लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

आरपी सिंगने सोडला आयपीएलचा बायोबबल, धक्कादायक कारण आले समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---