---Advertisement---

त्यावेळी धोनी हेडनला म्हणाला होता, मी तूला हवं ते देईल पण…

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 8:32 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने १० वर्षांपूर्वी २०१०च्या आयपीएल मोसमादरम्यान मुंगुस बॅट वापरली होती. त्या बॅटची हँडेल लांब होती. तसेच हँडेलच्या खालच्या बॅटचा भाग नेहमीच्या बॅटपेक्षा कमी उंचीचा होता. ही बॅट त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती.

या बॅटने हेडनने दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध ४३ चेंडूत ९३ धावांची खेळी देखील केली होती. मात्र चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी ही बॅट वापरण्याच्या विरोधात होता. याबद्दल हेडनने टीव्ही प्रेसेंटर रुपा रमाणीबरोबर चेन्नई सुपर किंग्सच्या लाईव्ह व्हिडिओ चॅटदरम्यान खुलासा केला होता.

तो म्हणाला होता, ‘मुंगूस बॅटबद्दल मत देणे कठीण आहे. मला या प्रॉडक्टबद्दल बरेच प्रश्न विचारण्यात आले. खेळाडूंच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास ते मला विचारायचे की की अर्ध्या आकाराच्या बॅटने कसा खेळतो. मला आठवते एमएस धोनी मला म्हणाला होता, ‘मित्रा मी तूला ही बॅट न वापरण्यासाठी तूझ्या आयुष्यात तूला हवं ते देईल, पण कृपया तू ही बॅट वापरु नको.’

‘मी एमएसला म्हणालो, ‘मी गेले दिडवर्षे या बॅटने नेटमध्ये सराव करत आहे. मी तूला सांगतो, जेव्हा चेंडू बॅटच्या मधे लागतो तेव्हा तो चेंडू नेहमीपेक्षा २० मीटरपेक्षाही पुढे जातो.’

तसेच हेडन या बॅटबद्दल म्हणाला, ‘मी माझ्या फ्रँचायझीला संकटात टाकू शकत नव्हतो त्यामुळे मी या बॅटचा पूर्ण गृहपाठ करुन आलो होतो. मी ही बॅट वापरण्यास तयार होतो. कधीकधी मी सामन्याच्या मधल्या काळात ही बॅट वापरायचो. मी ती सरळ मैदानावर घेऊन यायचो नाही. माझ्यासाठी ती एक मोक्याचे साधन बनली होती.’

त्याचबरोबर ही बॅट वापरणे हा धाडसी निर्णय असल्याचेही हेडनने सांगितले. तसेच तो म्हणाला, त्याचा विश्वास होता की या बॅटमुळे त्याचा खेळ चांगला होईल. अनेकदा त्याला ही बॅट वापरणे आवडायचे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---