भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धोनीवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून याबाबत बीसीसीआयकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राजेश कुमार मौर्या यांनी बीसीसीआयच्या एथिक्स कमिटीमध्ये धोनीविरोधात तक्रार पत्र दिलंय. या पत्रात त्यांनी धोनीवर 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणावर कारवाई करत बीसीसीआयनं धोनीला 30 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयच्या नियम 39 अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
ही तक्रार त्या 15 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे, जी धोनीनं मिहिर दिवाकर नावाच्या व्यक्तीविरुद्ध रांचीच्या दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. एथिक्स कमिटीनं धोनीला उत्तर देण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे, तर तक्रारदार राजेश मौर्य यांनाही 16 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
वास्तविक, महेंद्रसिंह धोनीने रांची सिव्हिल कोर्टात मिहिर दिवाकर नावाच्या व्यक्तीविरोधात केस दाखल केली होती. मिहिर दिवाकर व्यतिरिक्त धोनीनं सौम्या दास आणि अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरही फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते, जे त्याच्यासोबत व्यवसाय करत होते. धोनीनं मिहिरसोबत करार केला होता, जो 2021 मध्ये संपला होता. मात्र त्यानंतरही त्याची कंपनी धोनीच्या नावाचा वापर करत होती.
गुन्हा दाखल झाल्यावर या लोकांनी धोनीची 15 कोटींची फसवणूक केल्याचे उघड झालं. या प्रकरणावर न्यायालयाचा निर्णय 20 मार्च 2024 रोजी आला. न्यायालयानं मिहिर दिवाकर, सौम्या दास आणि अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात समन्स बजावण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा –
सूर्यकुमार यादवची अमेरिकेतही हवा! लोकप्रिय संघाकडून मिळाली खास भेट
विनेश फोगट प्रकरणी निकाल यायला विलंब का? निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे का ढकलण्यात आला?
नरेंद्र मोदी स्टेडियमचा मान जाणार! भारतात या ठिकाणी बनणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम