---Advertisement---

‘धोनी फॅमिली’च्या घरात नवीन पाहुणा, पती-पत्नी संगतीनं घेत आहेत खूप काळजी

On: शुक्रवार, मे 28, 2021 5:39 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीग 2021 स्थगित झाल्यामुळे आपला संपूर्ण वेळ पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांना देत आहे. रांची येथील आपल्या घरी धोनी आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. त्याचबरोबर आपल्या पाळीव प्राण्यांचाही सांभाळ करत आहेत. धोनीच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याने कुत्र्यांसोबत एक नवा घोडा नुकताच पाळला आहे. तो आपल्या घोड्याची काळजी घेताना दिसत आहे.

गुरुवारी (२७ मे) साक्षीने धोनीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या घोड्याची मालिश करताना दिसत आहेत. धोनीचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धोनी स्वतः सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. परंतु त्यांची पत्नी साक्षी नेहमी आपल्या पतीचे आणि मुलीचे व्हिडिओ शेअर करत असते. साक्षीच्या माध्यमातून चाहत्यांना समजते की, धोनी लॉकडॉऊनमध्ये कशाप्रकारे घरी वेळ घालवतो.

https://www.instagram.com/p/CPYTQXdHAOj/?utm_source=ig_web_button_share_sheet

मागील आठवड्यात साक्षीने आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केला होता, ज्यामध्ये धोनी आपल्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत होता. धोनी चेंडू फेकत होता आणि कुत्रा तो चेंडू उचलून परत घेऊन येत होता.

https://www.instagram.com/p/CPDCEE6HMXc/?utm_source=ig_web_button_share_sheet

आयपीएल 2021मध्ये चेन्नईचे उत्कृष्ट प्रदर्शन
आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित होण्याअगोदर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यांनी 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहेत. चाहत्यांना अशा आहे की, जेव्हा सामने पुन्हा एकदा सुरू होतील; तेव्हा ‘धोनी अँड कंपनी’ आपल्या उत्कृष्ट लयीला कायम ठेवत या हंगामाचा किताब जिंकतील.

महत्त्वाच्या बातम्या-

नाद करा पण आमचा कुठं! भारतीय क्रिकेटरचा पत्नीसोबत ‘खतरनाक वर्कआऊट’, पाहून फिरतील डोळे

“मी फक्त रिषभसाठी कसोटी क्रिकेट पाहतो”, इंग्लंडच्या गोलंदाजाने केली मुक्तकंठाने प्रशंसा

राखीव दिवस ते रिव्ह्यू, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम व अटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---