मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात, कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन या दोन दिग्गज खेळाडूंवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या दोघांनी वयाची 39 वर्ष पार केली आहेत. धोनी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा कर्णधार आहे. वॉटसनसुद्धा सीएसकेकडून खेळतो. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडू एकत्र नेट प्रॅक्टिसमध्ये जोरदार सराव करत आहेत.
यावर शेन वॉटसन याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी आणि तो नेटवर सराव करताना दिसत आहेत. यात कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “39 वर्षांचे दोन खेळाडू तेच करत आहेत जे आम्हाला पसंत आहे.”
At the ripe old age of 39 …. just two old guys doing what we love @ChennaiIPL 😊😊💕💕 pic.twitter.com/GM8AQlDgS6
— Shane Watson (@ShaneRWatson33) September 13, 2020
वयाच्या 39 व्या वर्षी अनेक क्रिकेटपटू घेतात निवृत्ती
वास्तविक जीवनात 39 वर्षीय व्यक्तीला म्हातारा म्हटले जात नाही, परंतु क्रिकेटसारख्या खेळामध्ये, या वयाच्या खेळाडूंना वयस्कर खेळाडू म्हटले जाते. या वयानंतर बरेच खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्याच बरोबर, फिटनेस आणि फॉर्म चांगले असल्यास बरेच खेळाडू पुढेही खेळतात. जसे की प्रवीण तांबे वयाच्या 48 व्या वर्षीही क्रिकेट खेळत आहेत. त्याच वेळी सचिन तेंडुलकरनेही नोव्हेंबर 2013 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी निवृत्ती घेतली.
इम्रान ताहिर आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू
या दोन दिग्गजांव्यतिरिक्त सीएसकेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर यांच्याबरोबर खेळत आहे. तो 41 वर्षांचा झाला आहे. तो या आयपीएलचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. याशिवाय किंग्ज इलेव्हन पंजाबमधील ख्रिस गेल (40), दिल्ली कॅपिटल्समध्ये अमित मिश्रा (37) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमधील डेल स्टेन (37) कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात खेळत आहेत.
3 वेळा विजेतेपद जिंकणारा चेन्नईचा संघही यंदा प्रबळ दावेदार
कोरोनामुळे, या वेळी आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होत आहे. पहिला सामना सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 3 वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. यावेळीदेखील सीएसके संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
या स्पर्धेत धोनीने 4432 आणि वॉटसनने 3575 केल्या धावा
आयपीएलमध्ये धोनीने 190 सामन्यांत 42.21 च्या सरासरीने 4432 धावा केल्या. तो या स्पर्धेत एकमेव खेळाडू असा आहे ज्याने 9 वेळा अंतिम फेरीत खेळला आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक धोनीने सर्वाधिक 132 खेळाडू बाद केले. या दरम्यान त्याने विकेटच्या मागे 94 झेल घेतला आणि 38 यष्टीचीत केले. त्याचवेळी आयपीएलमध्ये वॉटसनने 134 सामन्यात 31.09 च्या सरासरीने 3575 धावा केल्या आणि 92 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-पराक्रम केलाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने, आनंद झाला युएईमध्ये असलेल्या विराट कोहलीला
-क्रिकेटच्या खेळपट्टीवर चक्क डान्स करताना दिसला विराट कोहली; पहा व्हिडिओ
-शतक ठोकलेला फलंदाज म्हणतो, मी कितीही धावा केल्या, तरी मला संघात स्थान मिळू शकत नाही
ट्रेंडिंग लेख-
-सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज
-यंदाचा आयपीएल हंगाम गाजवू शकतात हे ५ दिग्गज सलामीवीर
-बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज