क्रिकेट विश्वात अनेकदा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची कर्णधार म्हणून तुलना केली जात असते. कर्णधार म्हणून कोण उत्कृष्ट यावर अनेकदा चर्चा होत असते, यात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदाची तुलना करत एक मोठे विधान केले आहे. मायकेल वॉनने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील आपला सर्वोत्तम कर्णधार निवडला आहे. तुम्हाला सांगूया की मायकेल वॉन नेहमीच भारतीय संघ आणि खेळाडूंविरोधात कडक टीका करण्यासाठी ओळखले जातात.
मायकेल वॉनने सर्वात्तम कर्णधार म्हणून कोणाला संबोधले?
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील कोण सर्वोत्तम कर्णधार यावर इंग्लंडचे पूर्व कर्णधार मायकल वॉंन असे म्हटले “माझ्या मते महेंद्रसिंग धोनी एक चांगला कर्णधार आहे कारण तो नाविन्यपूर्ण आहे आणि नवीन गोष्टींचा प्रयत्न करत असतो. धोनी हा विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठीजे केले ते आश्चर्यकारक आहे.” महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वखाली भारताने ३ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत, त्याच विश्वचषक २०११, आयसीसी चॅम्पयन्स ट्रॉफी २०१३ आणि टी२० विश्वचषक २००७ या स्पर्धांचा समावेश आहे.
कसोटीत विराट सरस
कसोटी क्रिकेटबद्दल बोलताना मायकल वॉनने सांगितले की विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगला कर्णधार आहे. ते म्हणाले “माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली हा चांगला कर्णधार आहे, त्याने भारताला कसोटी क्रिकेटमध्ये एक शिखर गाठून दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मी महेंद्रसिंग धोनीपेक्षा विराट कोहलीला अधिक प्राधान्य देईल. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये माझ्यासाठी महेंद्रसिंग धोनी हा सर्वोत्तम कर्णधार आहे. जर मला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात एक कर्णधार निवडावा लागला तर मी महेंद्रसिंग धोनीलाच निवडेल यात कोणतीच शंका नाही. ”
धोनी सध्या मोकळा वेळ कुटुंबासमवेत घालवत आहे
महेंद्रसिंग धोनी हा सध्या त्याच्या रांचीमधील फार्म हाऊसमध्ये आहे. तो तिथे त्याचा मोकळा वेळ कुटुंबासमवेत घालवत आहे. काहीदिवसांपूर्वीच महेंद्रसिंग धोनीने स्कॉटलंडवरून एक सुंदर घोडा मागवला आहे. महेंद्रसिंग धोनीने स्कॉटलंडवरून शेटलैंड पोनी जातीचा सुंदर घोडा मागवला आहे.
महत्वाच्या बातम्या
मायकल होल्डिंग यांनी केली भविष्यवाणी, ‘या’ कारणामुळे कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारत ठरले विजेता
विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
‘या’ कारणामुळे न्यूझीलंडविरुद्ध आर अश्विन ठरु शकतो टीम इंडियाचे प्रमुख शस्त्र






