चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने शनिवारी (३० एप्रिल) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा एकदा चेन्नईची धुरा एमएस धोनीच्या खांद्यावर आली. धोनीने ही जबाबदारी लिलया पार पाडत आयपीएल २०२२मध्ये चेन्नईचे नेतृत्व करताना खेळला गेलेला सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा पहिला सामना जिंकला. आयपीएल २०२२मधील ४६वा सामना चेन्नईने १३ धावांनी खिशात घातला. विजय तर मिळवलाच, पण एमएस धोनी सामन्यादरम्यान आपल्या गोलंदाजावर भलताच चिडलेला दिसला.
मुकेश चौधरीवर चिडला एमएस धोनी
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला शेवटच्या षटकात ३८ धावांची आवश्यकता होती. अशात हैदराबादच्या ताफ्यात असलेल्या वेस्ट इंडिजचा निकोलस पूरनने (Nicholas Pooran) मुकेश चौधरीच्या (Mukesh Choudhary) गोलंदाजीवर चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. विसाव्या षटकाच्या सुरुवातीच्या २ चेंडूंवर पूरनने १० धावा केल्या. यानंतर चौधरीने जे काही करण्याचा प्रयत्न केला, तो त्याच्यावरच उलटला. यामुळे एमएल धोनी (MS Dhoni) संतापला.
MS angry at Mukesh in the final over! I mean who wouldn’t be😃🙏#CSKvSRH #IPL2022 pic.twitter.com/RGShsHcs9O
— Navya (@SweptForASix) May 1, 2022
काही नवीन करण्याच्या प्रयत्नात चौधरीने चेंडू वाईड टाकला. त्यानंतर स्टंपमागे उभा असलेला एमएस धोनी चौधरीवर चिडलेला दिसला. तसेच, त्याने चौधरीला क्षेत्ररक्षण दाखवले. धोनी पुन्हा एकदा मैदानावर चिडलेला दिसला. कारण, शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी चांगल्या गोलंदाजाची आवश्यकता होती, त्यामुळे धोनी चांगलाच चिडला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने जिंकला सामना
तब्बल ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा चेन्नई संघ या सामन्यात हैदराबादविरुद्ध नाणेफेक पराभूत झाला होता. त्यामुळे चेन्नई संघ फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. यावेळी ऋतुराज गायकवाडने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने ५७ चेंडूत ९९ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ६ चौकार आणि ६ षटकार लगावले. याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवेने ८५ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या अर्धशतकी खेळीसह चेन्नईने निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत २०२ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघ ६ विकेट्स गमावत १८९ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना १३ धावांनी पराभवाचा धक्का बसला.
चेन्नई या विजयानंतर ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लतितने रोखले राहुलचे तिसरे शतक; स्पायडरमॅन बनून यादवने घेतला शानदार झेल