पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल २०२२ चा अकरावा सामना ५४ धावांनी जिंकला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ १२६ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यादरम्यान चेन्नईचा यष्टीरक्षक एमएस धोनी याने त्याच्यातील प्रामाणिकतेचा प्रत्यय देत सर्वांची मने जिंकली आहेत.
या सामन्यादरम्यान धोनीने (MS Dhoni) पंजाबच्या खतरनाक फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याचा यष्टीमागे झेल टिपला होता. परंतु झेल टिपतेवेळी त्याचे ग्लोव्ह्ज मैदानावर लागले होते, ज्यामुळे त्याने प्रामाणिकपणा दाखवत पंचांना मोठ्या स्क्रिनवर विकेट तपासण्यास (Dhoni Asks Umpire To Check Replay) सांगितले होते.
त्याचे झाले असे की, चेन्नईकडून ड्वेन प्रिटोरियस डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने या षटकातील दुसरा चेंडू अराउंड द विकेट टाकत लिविंगस्टोनला गोंधळात पाडले. लिविंगस्टोनने हा चेंडू लेग साइडच्या दिशेला फ्लिक करण्याचा प्रयतन केला. परंतु त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी यष्टीमागे धोनीने त्वरित डाईव्ह मारली आणि झेल टिपला. हे सर्व इतक्या वेगाने घडले की, धोनीने पकडलेला झेल अचूक असल्याचे वाटले.
धोनीने झेल घेतल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनीही जोराने पंचांकडे अपील केली. परंतु धोनीला आपल्या झेलवर शंका असल्याने (MS Dhoni Fair Play) त्याने स्वत:हून मैदानी पंचांना टीव्ही पंचांच्या सहमतीने योग्य निर्णय घेण्याचा इशारा केला. तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये विकेटची पडताळणी केली असता, धोनीने झेल घेण्यापूर्वी चेंडूने मैदानावर टप्पा खाल्याचे दिसले. परिणामी लिविंगस्टोनला जीवनदान मिळाले होते. त्यावेळी लिविंगस्टोन ४७ धावांवर खेळत होता.
https://twitter.com/Peep00470121/status/1510633734365904898?s=20&t=5-gjo0eC_9C5hOB2RZrDlg
या जीवनदानाचा फायदा घेत लिविंगस्टोनने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ३२ चेंडूत ६० धावा करत बाद झाला. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
धोनीने पंजाबच्या फलंदाजाला केले होते धावबाद
दरम्यान या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीचा विंटेज अवतार पाहायला मिळाला. धोनीने ज्या पद्धतीने पंजाब किंग्जचा फलंदाज भानुका राजपक्षेला धावबाद केले, त्यावरुन त्याने चाहत्यांना जुन्या धोनीची आठवण करुन दिली.
ही घटना पंजाब किंग्जच्या डावाच्या दुसऱ्या षटकात घडली, जेव्हा राजपक्षेने ख्रिस जॉर्डनच्या षटकाचा दुसरा चेंडू खेळला आणि तो एका धावेसाठी धावला. यावेळी शिखर धवनने त्याला अर्ध्या खेळपट्टीवरुन परत पाठवले. इतक्यात जॉर्डनने चेंडू पकडला आणि थेट यष्टीवर मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू पुढे गेला आणि मग वेगाने धोनी कव्हरसाठी धावला आणि चेंडू पकडला, तो अचूक स्टंपवर फेकला.
चेंडू स्टंपला लागेपर्यंत राजपक्षे क्रीजपर्यंत पोहोचू शकला नाही आणि धोनीच्या हसण्याने तो धावबाद झाल्याचे सांगितले. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि रिप्लेमध्ये राजपक्षे क्रीजपासून दूर असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभची दिल्ली फ्रँचायझी बनणार आणखी मजबूत, ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज लवकरच उतरणार मैदानात