भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्याला सीएसकेच्या जर्सीत खेळताना पाहण्यासाटी चाहते उत्सुक आहेत. आगामी आयपीएल हंगामापूर्वी धोनीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. कर्णधार त्यानंतर पुन्हा स्वतःल्या फलंदाजी आणि फिटनेसवर काम करत आहे. अशातच एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये धोनीने ग्रामदैवता देवरी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे.
एमएस धोनी () भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. यात वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश होतो. इंडियन प्रीमियर लीगमध्येही धोनी सर्वात यशस्वी कर्णधार आहे. चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने त्याच्याच नेतृत्वात सर्वाधिक पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. आगामी आयपीएल हंगामात देखील तो सीएसकेसाठी कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. पण त्याआधी माजी भारतीय कर्णधार मंगळवारी (5 फेब्रुवारी) देवरी मातेच्या मंदिरात दिसला.
एमएस धोनी मुळचा ‘रांची’चा आहे. रांचीजवळच देवरी मादेचे मंदीर अशून धोनीची देखील या मंदिरावर श्रद्धा आहे. याआधीही धोनी अनेकदा मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचला आहे. मंगळवारी देवरी मातेच्या मंदीरात पोहोचल्यानंतर चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
🫶♥️#MSDhoni pic.twitter.com/mM4Aj0eaNg
— Chakri Dhoni (@ChakriDhoni17) February 6, 2024
MS Dhoni at Deori Maa Temple for blessings from God. pic.twitter.com/FUoHhogiLf
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2024
दरम्यान, धोनी अद्याप आयपीएलमधून निवृत्त झाला नाहीये. पण मागच्या काही हंगामांपासून त्याच्या निवृत्ताबाबत सतत चर्चा आणि बातम्या येत राहिल्या आहेत. आयपीएल 2023 नंतर धोनी या लीगमधूनही निवृत्ती घेणार, असा शक्यता दाट होती. पण धोनीने अद्याप निवृत्ती घेतली नाहीये. याच पार्श्वभूमीवर तो आगामी हंगामात देखील संघाचे नेतृत्व करणार, हे स्पष्ट होत आहे. धोनीच्या काही आजी-माजी सहकाऱ्यांनी त्याच्या फिटनेसबाबत कुठली चिंता नाही आणि तो पुढचे काही हंगाम आयपीएलमध्ये खेळू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. पण मागच्या संपूर्ण आयपीएल हंगामात धोनीने गुडघ्याला पट्टी बांधून फलंदाजी आणि यष्टीरक्षण केले. नुकतीच त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया पार पडली. अशात आगामी आयपीएल हंगाम झाल्यानंतर निवृत्तीबाबत दिग्गज काय निर्णय घेणार, हे पाहण्यासारखे असेल. ()
महत्वाच्या बातम्या -MS Dhoni at Deori Maa Temple for blessings
धक्कादायक! कॅरेबियन खेळाडूला दाखवला बंदुकीचा धाक, एसए20 लीगमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न
क्रिकेटजगतात सुरू झाला नवा वाद, रोहितकडून कर्णधारपद काढून घेणं चुकीचं! पत्नी तिरिकाची पहिली प्रतिक्रिया