---Advertisement---

धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा माझा एकट्याचा निर्णय नव्हता – संजय बांगर

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2019 8:16 PM
---Advertisement---

मागील महिन्यात पार पडलेल्या 2019 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.

या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे पहिले 3 फलंदाज 10 चेंडूंच्या आत बाद झाले होते. असे असतानाही भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांना फलंदाजीची संधी मिळाली.

धोनीला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली. तसेच या दरम्यान असेही वृत्त आले होते की धोनीला 7 व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी घेतला होता.

पण हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हा निर्णय त्यांचा एकट्याचा नसल्याचा खूलासा बांगर यांनी केला आहे. त्यांना जेव्हा धोनीला 7 व्या क्रमांकावर पाठवण्याचा तूमचा निर्णय होता का असे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘मला आश्चर्य वाटते की लोक याबाबत माझ्याकडे पाहत आहेत. हा माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता.’

‘आम्ही बर्‍याच परिस्थितींचे मूल्यांकन करतो आणि त्यातून निर्णय घेतो. विश्वचषकाच्या सुरुवातीलाच काही जबाबदाऱ्या फलंदाजांना देण्यात आल्या होत्या. आम्ही हा देखील निर्णय घेतला होता की मधल्या फळीतील 5, 6 आणि 7 व्या क्रमांकामध्ये लवचिकता ठेवू. याबाबत प्रत्येकाला माहिती होती.’

‘विराट कोहलीनेही उपांत्य सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर असे ठरले होते की धोनी तळाला फलंदाजी करेल. जेणेकरुन तो 35 षटकांनंतर सामना सांभाळू शकेल. तळातली फलंदाजी सांभाळू शकेल आणि शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करु शकेल. म्हणून त्याला उपांत्य सामन्यात सहाव्या क्रमांकावर(7 व्या क्रमांकावर)पाठवण्यात आले.’

‘त्याच्याआधी दिनेश कार्तिकला 5 व्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण विकेट्स झटपट गेल्याने धोनीवर फिनिशरची जबाबदारी आली. रवी शास्त्रींनीही सांगितले होते की धोनीला तळात फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय संघाचा होता. म्हणून त्याला सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आले.’

‘असे असतानाही मला समजत नाही की धोनीला 7 व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा आहे, असे का वाटते.’

बांगर हे भारतीय संघाबरोबर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून 2014 पासून आहेत. त्यानी 50 कसोटी आणि 119 वनडे सामन्यात भारतीय संघाला मार्गदर्शन केले आहे. त्यांनी या मुलाखतीदरम्यान असे देखील सांगितले की उपांत्य सामन्यातच बाहेर पडल्याने अन्य भारतीयांप्रमाणे संघही अत्यंत निराश झाला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कसोटीमध्ये क्रमांक, नाव असलेली जर्सी घालण्यावर भडकला हा माजी यष्टीरक्षक

…आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा उद्यापासून सुरु होणारा वेस्ट इंडीज दौरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment