येत्या काही दिवसातच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ९ एप्रिल पासून आयपीएल २०२० स्पर्धा भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील सरावाला सुरुवात केली आहे. या संघाचा कर्णधार एमएस धोनी याचे असंख्य चाहते आहेत. अशातच आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाच एमएस धोनीने अन्न व पेय पदार्थ ‘सेव्हन इंक ब्र्यूज’ कंपनीच्या स्टार्टअपमध्ये भागीदारी केली आहे. तसेच धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटवर प्रेरित होऊन त्यांनी एक चॉकलेट देखील लाँच केली आहे. मुंबई स्थित या कंपनीचे संस्थापक मोहित भगचंदानी आहेत. तर सह संस्थापक आदिल मिस्त्री आणि कृणाल पटेल आहेत.
धोनीने कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या दृष्टीकोनातून प्रभावित होतो. तेव्हा ही भागीदारी अधिक अर्थपूर्ण बनते. या कंपनीचा भागीदार झाल्याने मला खूप आनंद झाला आहे.”
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की ,”धोनीच्या वेगवेगळ्या जर्सी आणि रंगावरून प्रॉडक्टची पॅकेजिंग करण्यात येणार आहे. हे एक महत्वपूर्ण वैशिष्ठ्य असणार आहे.”
तसेच मुंबई, पुणे, गोवा आणि बेंगलुरू येथे हे प्रोडक्ट लाँच केल्यानंतर आता उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, पंजाब आणि चंदीगडमध्येही हे प्रोडक्ट्स बाजारात आणले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठे साम्य, रिकी पाँटिंगने केला दावा
‘या’ कारणामुळे चाहत्याने उडवली खिल्ली उडवल्यानंतर गिलने दिले चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाला
मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर अतिरेकी बनला असता, तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त विधान