वेलिंगटन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात वेस्टपॅक स्टेडीयमवर सुरु असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक कर्णधाक एमएस धोनीला फलंदाजीत विशेष काही करता आलेले नाही. असे असले तरी त्याच्यासाठी हा सामना खास ठरला आहे. धोनीचा हा भारताकडून 335 वा वनडे सामना आहे.
त्यामुळे तो भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकले आहे. अझरुद्दीन यांनी भारताकडून 334 वनडे सामने खेळले आहेत.
धोनीने आत्तापर्यंत वनडे कारकिर्दीत 338 सामने खेळले आहेत, पण यातील तीन सामने त्याने आशिया एकादश या संघाकडून खेळले आहेत.
आज धोनीला 1 धावच करण्यात यश आले आहे. त्याला ट्रेंट बोल्टने त्रिफळाचीत करत बाद केले. त्यामुळे भारताची आवस्था 4 बाद 18 धावा अशी झाली होती. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.
रायडूने 90 धावा करताना 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शंकर 45 धावांवर बाद झाल्यानंतर केदार जाधव बरोबर सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.
केदारने 34 धावा तर शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.
भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारे क्रिकेटपटू –
463 – सचिन तेंडुलकर
340 – राहुल द्रविड
335 – एमएस धोनी
334 – मोहम्मद अझरुद्दीन
308 – सौरव गांगुली
301 – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
–वनडेत या गोलंदाजांविरुद्ध हार्दिक पंड्याने केली आहे षटकारांची हॅट्रिक
–विराट कोहली-स्म्रीती मंधानाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग
–रायडू-विजय जोडी चमकली, संघाला संकटातून बाहेर काढताना केला हा मोठा पराक्रम
–रोहित शर्माची ती शतकांची मालिका अखेर खंडीत