---Advertisement---

मल्टिटास्किंग माही! मेंटरसह धोनी टीम इंडियासाठी निभावतोय आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका; बीसीसीआयचा खुलासा

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 10:57 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव जगातील महान कर्णधारांमध्ये घेतले जाते. याला कारणेही तशीच आहेत. टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाचे कौशल्य दाखवलेय. त्याला सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे मार्गदर्शक (मेंटर) बनवण्यात आले. या नव्या भूमिकेत तो अत्यंत एकरूप झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये धोनी भारतीय खेळाडूंना थ्रो-डाऊन करत असल्याचे दिसत आहे.

बीसीसीआयने शेअर केली छायाचित्रे
मुख्य स्पर्धेच्या आधी झालेल्या दोन सराव सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे होणार आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाचा नवा मेंटर असलेल्या एमएस धोनीने थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट म्हणून नवी भूमिका पार पाडली. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून काही छायाचित्रे शेअर करताना त्याला ‘भारतीय संघाचा नवा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.’ असे कॅप्शन दिले.

https://twitter.com/BCCI/status/1451561112051204105?t=F068Ueie4VkRMUgL0SWbrg&s=19

भारतीय संघाला प्रशिक्षण देतोय धोनी
आयपीएल २०२१ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धोनी भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये दाखल झाला होता. तेव्हापासून तो सातत्याने खेळाडूंशी चर्चा करताना दिसतोय. त्याने रिषभ पंत व ईशान किशन यांना यष्टीरक्षणाचे धडे दिले. तसेच, खराब फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्या याच्या सोबतही तो चर्चा करताना दिसून आला होता.

दिग्गजांनी केले कौतुक
धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवल्यानंतर जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले होते. सुनील गावसकर, लक्ष्मीपती बालाजी, डेल स्टेन, शोएब अख्तर व मायकेल वॉन यांनी तो भारतीय संघाचा मार्गदर्शक बनल्यानंतर भारतीय संघ एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

आजपासून रंगणार सुपर १२ फेरीतील सामन्यांचा महासंग्राम, वेस्ट इंडिजविरुद्ध जुना हिशोब बरोबर करेल इंग्लंड

‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच; शिवाय अशाप्रकारे केली देशाची सेवा

मराठीत माहिती- क्रिकेटर जोगिंदर शर्मा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---