---Advertisement---

धोनीने थेट स्कॉटलंडवरुन मागवला खास घोडा, किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

On: शुक्रवार, जून 4, 2021 4:35 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर आपल्याला क्रिकेट व्यतिरिक्त विविध गोष्टी करतांना दिसून येतो. कधी तो टोमॅटोची लागवड करताना दिसून येतो तर कधी आपल्या बाईक्स वर फेरफटका मारतांना. परंतु त्याला अजून एक आवड आहे ती म्हणजे अश्व पालनाची. धोनीच्या सिमलिया फार्म हाऊसवर “शेटलॅण्ड पोनी” जातीचा नवीन अश्व थेट स्कॉटलंड वरून डेरेदाखल झालाय. या घोड्याच वय 2 वर्ष असून त्याची उंची फक्त 3 फुटांपर्यंत वाढू शकते.

हा नवीन अश्व धोनीच्या सिमलिया फार्म हाऊस वर असून तिथे धोनीची लेक झिवा आपला वेळ ह्या नवीन पाहुण्यासोबत खेळून घालवत आहे. तर त्यांचा जुना अश्व चेतक त्याच्या रांचीतील संबो फार्म हाऊस वर आहे. काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी संबोस्थित गोशाळेत गायींना वैरण पाणी करतांना दिसून आली होती. धोनी व त्याच्या कुटुंबियांना पाळीव प्राण्यांविषयी विशेष प्रेम असून ते प्रेम आपल्या समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात.

वास्तविक, धोनीच्या फार्म हाऊसवर सगळ्यात आधी आलेला चेतक 11 महिन्याचा मारवाडी जातीचा अश्व आहे. हा काळ्या रंगाचा चेतक आपल्या वेगासाठी ओळखला जातो. तर हा नवीन शेटलॅण्ड पोनी जातीचा श्वेत रंगाचा आणि उंचीने देखील अतिशय बुटका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याला खूप मागणी आहे.

https://www.instagram.com/p/CPp0Do3HMfL/?utm_source=ig_embed&ig_rid=0cafc987-8aaa-4d11-8c51-3cde3a1819bb

धोनीने केलेत लाखो रुपये खर्च
घोड्यांचा शौकीन असलेल्या धोनीने ह्या घोड्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात ह्या अश्वाला मागणी असून त्यासाठी चांगली किंमत देखील धोनीला मोजावी लागली आहे. धोनीच्या रांचीमधील संबो फार्म हाऊसवर घोडेस्वारीची तयारी जोरदार चालू असून त्यासाठी अजून 5-6 घोडे बाहेरून मागवण्यात येणार आहेत.

यापूर्वी महेंद्र सिंग धोनीने त्याच्या शेतात विविध फळभाज्यांची लागवड केली होती आणि त्यात त्याच्या शेतातल्या टोमॅटोला थेट दुबईच्या बाजारपेठेत मागणी होती.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट किंवा रोहित नाही तर गावसकरांच्या मते हा आहे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज

कमालच! सहा वर्षांचा चिमुकला चक्क धोनी स्टाइलमध्ये मारतो आहे हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडिओ

इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो हा महत्वाचा बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---