मुंबई । भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देणारा फलंदाज एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. धोनीने आपल्या कारकिर्दीत सर्व काही साध्य केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या धोनीने आपल्या पराक्रमातून नवी उंची गाठली, जगात स्वतःचे नाव बनविले. त्यांनंतर मोठ- मोठ्या ब्रँडने त्याच्याबरोबर करार करण्यास सुरवात केली.
धोनीने बर्याच मोठ्या ब्रँड्सबरोबरही काम केले आहे. परंतु धोनीचे पाय अजूनही जमीनीवर आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. आजही संपूर्ण जगात त्याचे नाव आहे. पण त्याने संघर्षाच्या दिवसात आपल्या सोबत असलेल्या लोकांना सोडले नाही. तो आपल्या जुन्या मित्रांसमवेत आणि मदतनीस बरोबर आजही वेळ घालवितो. धोनीचे अजूनही बॅट कंपनीशी खास नाते आहे, ज्यांनी त्याला कठीण काळातून मदत म्हणून किट दिले होती.
नुकतेच, त्या कंपनीच्या मालकाने एमएस धोनीबद्दल एक किस्सा शेअर केला. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, बास कंपनीचे 66 वर्षीय मालक सोमी म्हणाले की, “रांचीचे एक डीलर परमजीत सिंगने धोनीचे कौतुक केले होते आणि तो धोनीला प्रायोजित करण्यासाठी आग्रह धरत होता. त्यावेळी धोनी फक्त 18 वर्षांचा होता.”
ते म्हणाले, “त्या दिवसांत धोनीला महागडे आणि चांगले किट विकत घेणे अवघड होते. परंतु विक्रेता आणि मित्र परमजीत सिंगने त्याला खूप मदत केली. त्यावेळी धोनी क्रिकेटमध्ये स्थिर नव्हता. परमजीतला आम्हाला धोनीचा प्रायोजित करण्यास सहा महिने लागले. आम्ही नेहमीच नवीन प्रतिभेचा शोध घेत असतो आणि आमचा डीलर परमजीत सिंग धोनीला प्रायोजित करण्यासाठी आम्हाला सतत बोलत होता,” सोमी यांनी सांगितले.
“त्याच्या सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर मी फेब्रुवारी 1998 मध्ये धोनीला किट पाठवले आणि त्या दिवसापासून त्यांचे आणि धोनीचे माझ्याशी चांगले संबंध वाढले. धोनीच्या निवृत्तीबद्दल जेव्हा मला समजले, तेव्हा पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता आणि काही तास झोपही लागत नव्हती,” असे सोमीने सांगितले.
बायकोने ओळखले नाही
सोमीने धोनीशी संबंधित एक रंजक किस्साही सांगितला. ते म्हणाले की, “2004 मध्ये मी चंदीगड येथे प्रथमच धोनीला भेटलो आणि काही महिन्यांनंतर धोनी फॅक्टरी भेट देण्यासाठी जालंधरला आला आणि माझ्या घरी थांबला. जेव्हा तो माझ्या पत्नीला भेटला, तेव्हा तिने विचारले की हा कोण आहे? दुसऱ्या दिवशी मी धोनीला भेटलो, तेव्हा तो म्हणाला की तुमच्या पत्नीचे शब्द ऐकल्यानंतर बराच वेळ झोपू शकलो नाही.”
सोमी म्हणाले, “पुढे काही महिन्यांनंतर धोनीने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले आणि रात्री अकरा वाजता त्याने मला फोन करून सांगितले की, मला तुमच्या पत्नीशी बोलायचे आहे. धोनी म्हणाला, काकू मी धोनी आहे. यानंतर माझी पत्नी म्हणाली बेटा, आता धोनी कोण आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीचे आरसीबीचे कर्णधारपद जाणार?, संघ मालकाने दिली प्रतिक्रिया
-आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात सयूएईला रवाना होण्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या धडाकेबाज खेळाडूने जिंकले चाहत्यांचे मन, विमानतळावरील…
-दोन दिवसांपासून गर्विष्ठ म्हणणाऱ्या लोकांना दिले विराटने दिले सडेतोड उत्तर
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…
-आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ऍलन विल्किंंस