भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भले ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. परंतु त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्याची वाट बघत असतात. धोनीचे ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांवर बरेच अकाऊंट आहेत. मात्र, त्यावर तो कधीतरीच सक्रिय असतो. परंतु त्याचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत असतात. सध्या धोनीचा ख्रिसमस दिवशीचा फोटो व्हायरल होत आहे.
हा फोटो धोनीजम या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये धोनी आणि त्याची मुलगी जीवा व इतर मित्र ख्रिसमसच्या झाडा शेजारी उभे राहिलेले दिसत आहेत. ते ख्रिसमस सण साजरा करत असताना दिसत आहेत. यामध्ये धोनीने आपल्या मुलीला कडेवर घेतले आहे आणि त्याच्या डोक्यावर लाल टोपी आहे. त्याचबरोबर त्याच्या दोन मित्रांनी लाल कपडे आणि टोपी घातली आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
https://twitter.com/DHONIism/status/1342490343124606984?s=20
धोनीने यंदा 15 ऑगस्ट दिवशी मर्यादित षटकांच्या सामन्यातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपला शेवटचा सामना 2019 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला होता. परंतु तो आयपीएल स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यानी यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सुद्धा भाग घेतला होता. त्याने आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार असल्याचेही सांगितले आहे.
धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला चौथ्यांदा विजेतेपद पटकावून देण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
परंतु धोनीचा जवळचा मित्र सुरेश रैनाने धोनी पाठोपाठ आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, तो देशांतर्गत खेळल्या जाणार्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सहभागी होणार आहे. सुरेश रैना उत्तर प्रदेश या राज्याच्या संघाकडून खेळणार आहे. परंतु धोनी हा या स्पर्धेत सहभागी होणार नाही.
धोनीची आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरी
भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना धोनीने भारतीय संघाला 2007 साली टी-20 विश्वचषक आणि 2011 साली वनडे विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे. याव्यतिरिक्त 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीही त्याने भारतीय संघाला मिळवून दिली आहे. धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 4876 धावा, वनडेत 10773 धावा आणि टी-20त 1617 धावा केल्या आहेत. धोनीने वनडेत 6 शतके आणि कसोटीत 10 शतकेही झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर; अर्जुनला डच्चू, तर ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केला भारतीय फलंदाजी रणनितीचा खुलासा, म्हणाला…
‘तो खूप मेहनतीने इथे पोहोचला आहे’, भारताच्या प्रमुख गोलंदाजाने केली सिराजची प्रशंसा






